computer

१९८३ साली वर्ल्डकप जिंकणाऱ्या संघाला किती पैसे मिळाले होते? सॅलरी स्लिप बघून घ्या भाऊ!!

अनपेक्षितपणे मिळविलेला विजय अधिक आनंददायक असतो असे म्हटले जाते. १९८३ साली जिंकलेला वर्ल्डकप असाच जगाला आपण दिलेला अनपेक्षित धक्का होता. तत्कालीन दिग्गज संघांना धूळ चारत कपिल देवाच्या नेतृत्वाखालील संघाने हा वर्ल्डकप भारतात आणला होता.

भारतातील जनतेसाठी हा मोठा अभिमानाचा क्षण होता. देशभर खेळाडूंचे जंगी स्वागत झाले होते. स्वतः पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी या खेळाडूंचे स्वागत केले होते. संघातील खेळाडूंना या कामगिरीसाठी अनेक सन्मान आणि बक्षिसे मिळाली होती.

आता राष्ट्रीय संघात खेळणारे खेळाडू करोडो रुपये मानधन म्हणून घेत असतात. पण त्याकाळी ही फी किती होती हा प्रश्न तुम्हाला कधीतरी पडला असेल. आज याच प्रश्नाचे उत्तर तुम्हाला मिळेल. त्याकाळी या संघाला किती पैसे मिळत होते, हे खाली दिलेल्या स्लिपमध्ये तुम्ही बघू शकता.

यावरून सरळ स्पष्ट होते की त्याकाळी खेळाडूंना दररोज १५०० रुपये आणि ६०० रुपये भत्ता असे करून एकूण २१०० रुपये प्रतिदिन मिळाले होते. ही पेमेंट स्लिप पाकिस्तानी माजी खेळाडू रमीझ राजा यांनी ट्विटरवर पोस्ट केली होती.

राजा यांनी म्हटले होते की, आम्हाला ८६-८७ साली ६ वनडे आणि ५ टेस्ट खेळण्याचे तब्बल ५५,०००रुपये मिळाले होते. एकाअर्थाने पाकिस्तानी खेळाडूंना भारतीय खेळाडूंच्या मानाने किती बक्कळ मानधन मिळत होते हेच ते सिद्ध करू पाहत होते.

आजचा काळ मात्र बदलला आहे. आज भारतीय खेळाडूंना पाकिस्तानी खेळाडूंच्या मानाने कितीतरी पट अधिक मानधन मिळते. शेवटी 'बात वक्त वक्त की होती है' हेच खरे...

उदय पाटील

सबस्क्राईब करा

* indicates required