मराठमोळ्या स्मृती मंधाना आणि हरमनप्रीत कौरची ऐतिहासिक कामगिरी, 'या' मोठ्या विक्रमाला घातली गवसणी

भारतीय महिला संघ आणि वेस्ट इंडिज महिला संघ यांच्यात झालेल्या सामन्यात हरमनप्रीत कौर आणि स्मृती मंधांना यांनी मोठा विक्रम आपल्या नावावर केला आहे. या दोन्ही फलंदाजांनी तुफानी खेळी करत विक्रमी भागीदारी केली आहे. 

आयसीसी महिला विश्वचषक २०२२ स्पर्धेत भारतीय फलंदाजांनी जोरदार कामगिरी केली आहे. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघातील फलंदाजांनी धावांचा पाऊस पाडत ८ गडी बाद ३१७ धावा केल्या होत्या. या दरम्यान स्मृती मंधांना आणि हरमनप्रीत कौर यांनी आतापर्यंत आयसीसी महिला विश्वचषक स्पर्धेच्या इतिहासात भारतीय संघाकडून चौथ्या गडी साठी सर्वात मोठी भागीदारी केली आहे. दोघांनी मिळून विक्रमी १८४ धावांची भागीदारी केली.

 या भागीदारी दरम्यान स्मृती मंधांनाने ११९ चेंडूंमध्ये १३ चौकार आणि २ षटकारांचा मदतीने १२३ धावांची खेळी केली. तर हरमनप्रीत कौरने १०७ चेंडूंमध्ये १० चौकार आणि २ षटकारांचा साहाय्याने १०९ धावांचे योगदान दिले. या भागीदारीच्या जोरावर भारतीय संघाला ३०० पेक्षा अधिक धावा करण्यात यश आले.

यासह ही जोडी महिला विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाकडून सर्वात मोठी भागीदारी करणारी जोडी ठरली आहे. यापूर्वी हा विक्रम थिरुश कामिनी आणि पूनम राऊत यांच्या नावावर होता. ज्यांनी २०१३ मध्ये झालेल्या विश्वचषक स्पर्धेत १७५ धावांची मॅरेथॉन भागीदारी केली होती. तसेच कर्णधार मिताली राज आणि पूनम राऊत यांनी २०१७ मध्ये झालेल्या विश्वचषक स्पर्धेत १५७ धावांची जबरदस्त भागीदारी केली होती.

सबस्क्राईब करा

* indicates required