भारताच्या या फुटबॉल पटूचा स्ट्राईक रेट मेसी, रोनाल्डो पेक्षा भारी...वाचा कोण आहे हा पठ्ठ्या !!!

भाऊ फुटबॉलमध्ये आपला नंबर लै मागे आहे. एवढ्या मागे की आपल्या मुंबईच्या एवढ्या साईजचे देश आपल्यापेक्षा 100 नंबरानी पुढे आहेत. तर या अशा अतिशय कमकुवत संघाचा कॅप्टन मात्र भारी खेळाडू आहे. त्याचं नाव आहे सुनील छेत्री. तर या खेळाडूने चक्क वेन रूनीला मागे टाकलं आहे.

तर असे आहे की एकूणच सध्या ऍक्टिव्ह असणाऱ्या आणि आपल्या देशासाठी गोल करणाऱ्या खेळाडुंमध्ये छेत्रीचा चौथा क्रमांक लागतो. 15 जूनला झालेल्या भारताच्या करगिस्तान विरुद्ध झालेल्या सामन्यात त्याने 54 वा गोल केला आहे. त्याच्यापुढे सध्या पोर्तुगालचा क्रिस्टियानो रोनाल्डो 74 गोल, अर्जेंटिनाचा लिओनेल मेस्सी 58 गोल आणि अमेरिकेचा क्लायंट डेम्सी 56 गोल करून पुढे आहेत.

याहून कमालीची बाब म्हणजे सुनीलचा गोल पर मॅच रेशो हा इतर सगळ्यांपेक्षा चांगला आहे.  सुनीलने प्रत्येक सामन्यात 0.57 गोल्स केले आहेत. तर रोनाल्डो 0.525, मेस्सी 0.49 आणि demsi 0.42 गोल्स करून त्याच्या मागे आहेत.  ब्राझीलंचा नेयमार, मालदीवचा अली अशफाक आणि बॉस्नियाचा इडिन जेको त्याच्या पुढे आहेत.

तर काय म्हणणं आहे तुमचं हे स्टॅटिस्टिक पाहून? हे आकडे काय कच्चा टीम विरुद्धचे आहेत?  काय म्हणता, रोनाल्डो विरुद्ध खेळून दाखवावं छेत्रीने? अहो हे आहेत स्टॅटिस्टिक भारतासारख्या फुटबॉलला इग्नोर मारणाऱ्या देशातून. जिथं फुटबॉल खेळाडूंना काही मदत मिळत नाही, तिथं असे स्टॅटिस्टिक मिळवणं सुद्धा अभिमानास्पद आहे.

सबस्क्राईब करा

* indicates required