ट्रेनचे रुपांतर झाले स्विमिंग पूलमध्ये - बघा काय आहे हा अजब प्रकार!!

तायपेई या तैवानच्या राजधानीत तिथल्या प्रशासनाने लोकांना एक अजब सरप्राईझ दिलंय राव. नेहमीची MRT (Mass Rapid Transit) ट्रेन, नेहमीचीच गर्दी पण आज काही तरी वेगळं घडलंय. प्रवाशांनी आपल्या पायाकडे लक्ष दिलं आणि त्यांना धक्काच बसला. ट्रेनच्या फरशीवर काही ठिकाणी  स्विमिंग पूल होता तर कुठे बास्केट बॉलचं मैदान.  एवढंच काय, फुटबॉलचं मैदानसुद्धा होतं. पण मंडळी, ते काही खरोखरचं नव्हतं.  

मंडळी , ही भन्नाट आयडिया Summer Universiade 2017 या स्पर्धांच्या प्रचारासाठी करण्यात आली आहे. त्यासाठी तिथल्या प्रशासनाने ट्रेनच्या फरशीवर असं काही डेकोरेशन केलंय की ते जणू हुबेहूब स्विमिंग पूल किंवा फुटबॉलचं मैदान वाटावं.

Summer Universiade या स्पर्धा यावर्षी १९ ते ३० ऑगस्ट या दरम्यान होणार आहेत आणि या स्पर्धांचं यजमानपद यंदा तायपेईकडे असणार आहे. त्यामुळे आतापासूनच त्याच्या प्रचाराची जोरदार तयारी चालू आहे. ऑलम्पिक नंतर Summer Universiade या स्पर्धांना महत्वाचं स्थान आहे.

चला तर बघूया या भन्नाट आयडियाचे काही फोटो !!

 

 

गेट सेट गो !!!

 

 

(सर्व फोटो स्रोत)

सबस्क्राईब करा

* indicates required