computer

हे आहेत टी२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक वेळेस गोल्डन डकवर बाद होणारे टॉप ३ फलंदाज

क्रिकेट या खेळाला २०० पेक्षा अधिक वर्षांचा इतिहास आहे. या खेळाची सुरुवात झाली त्यावेळी केवळ कसोटी क्रिकेट खेळले जायचे. त्यानंतर कालांतराने बदल घडत गेले आणि कसोटी क्रिकेटनंतर वनडे आणि टी२० चा देखील या खेळात समावेश आला. २००५ मध्ये टी२० क्रिकेटला सुरुवात झाल्यानंतर फ्रांचायजी क्रिकेटला देखील सुरुवात झाली. ज्यात इंडियन प्रीमियर लीग, बिग बॅश लीग आणि कॅरिबियन प्रीमियर लीग सारख्या स्पर्धांचा समावेश आहे. या स्पर्धेत जगभरातील अनेक दिग्गज खेळाडू सहभाग घेत असतात. काही खेळाडू चमकदार कामगिरी करतात, तर काही खेळाडू पहिल्याच चेंडूवर बाद होत असतात, ज्याला क्रिकेटच्या भाषेत गोल्डन डक असे म्हणतात. या लेखातून आपण ३ अशा फलंदाजांबद्दल जाणून घेणार आहोत जे टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक वेळेस गोल्डन डक वर बाद झाले आहेत.

१) राशिद खान ( Rashid Khan)

Rashid khan

अफगाणिस्तान संघाचा प्रमुख फिरकीपटू राशिद खान या यादीत सर्वोच्च स्थानी आहे. अनेकदा त्याने आपल्या संघाला आपल्या उत्कृष्ट गोलंदाजीच्या जोरावर विजय मिळवून दिला आहे. परंतु फलंदाजीमध्ये सर्वाधिक वेळेस गोल्डन डकवर बाद होण्याचा यादीत तो पहिल्या स्थानी आहे. टी २० क्रिकेटच्या इतिहासात तो आतापर्यंत एकूण ३३ वेळेस गोल्डन डकवर बाद झाला आहे. यावेळी तो आयपीएल स्पर्धेत गुजरात टायटन्स संघाचे प्रतिनिधित्व करत आहे.

२) सुनील नरेन (Sunil narine)

Sunil narine

वेस्ट इंडिज संघाचा अष्टपैलू खेळाडू सुनील नरेन या यादीत दुसऱ्या स्थानी आहे. सुनील नरेन हा मोजक्याच गोलंदाजांपैकी एक आहे ज्याची गोलंदाजी समजून घेणं फलंदाजांना खूप कठीण जातं. परंतु फलंदाजीमध्ये त्याला विशेष अशी कामगिरी करता आली नाहीये. टी २० स्पर्धेच्या इतिहासात तो तब्बल ३२ वेळेस गोल्डन डकवर बाद झाला आहे. 

३) ख्रिस गेल ( chris gayle)

Chris Gayle

युनिव्हर्स बॉस म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ख्रिस गेलने टी२० क्रिकेटमध्ये आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. सर्वाधिक धावा, सर्वाधिक षटकार मारण्याच्या यादीत तो सर्वोच्च स्थानी आहे. यासह सर्वाधिक वेळेस गोल्डन डकवर बाद होणाऱ्या फलंदाजांच्या यादीत तो तिसऱ्या स्थानी आहे. ख्रिस गेल आतापर्यंत टी२० क्रिकेटमध्ये एकूण ३० वेळेस गोल्डन डकवर बाद झाला आहे.

 

ही यादी अशी मर्यादितच राहावी, हीच सदिच्छा! हो ना?

सबस्क्राईब करा

* indicates required