टी -२० क्रिकेटमध्ये या फलंदाजांनी मारले आहेत सर्वाधिक षटकार! पाहा टॉप ५ फलंदाजांची यादी...

क्रिकेट हा असा खेळ ज्याला संपूर्ण जगभरात पसंती दिली जाते. भारतात तर हा खेळ जरा जास्तच प्रसिद्ध आहे. या खेळाला खेळ नव्हे तर चक्क धर्म मानतात. टी -२० क्रिकेट आल्यापासून क्रिकेट पाहणाऱ्यांची संख्या दुप्पट झाली आहे. २००६ मध्ये टी -२० फॉरमॅटला सुरुवात झाली होती. ३ तासांचा सामना आणि त्यातही चौकार षटकारांचा पाऊस म्हणजे पैसा वसूल होतोच. फलंदाज खेळपट्टीवर आला की, पहिल्या चेंडू पासून फटकेबाजी सुरू होते. गोलंदाजाला खेळपट्टीचा अंदाज घेण्या इतकाही वेळ नसतो. त्यामुळे फलंदाजांची मजा होते. तसेच काही असे फलंदाज आहेत जे जगभरातील लीग स्पर्धा खेळत असतात. या लेखातून आम्ही तुम्हाला अशा टॉप ५ फलंदाजांबद्दल माहिती देणार आहोत ज्यांनी टी २० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारले आहेत.

) ख्रिस गेल (chris gayle) :

या यादीत वेस्ट इंडिज संघाचा विस्फोटक फलंदाज ख्रिस गेल सर्वोच्च स्थानी आहे. युनिव्हर्सल बॉस म्हणून ओळखला जाणारा हा फलंदाज या यादीत सर्वोच्च स्थानी का आहे याबाबत अधिक सांगण्याची आवश्यकता नाही. मैदानात येताच हा फलंदाज चौकार आणि षटकारांचा पाऊस पाडतो. ख्रिस गेलने आतापर्यंत टी २० क्रिकेटमध्ये एकूण १०५६ षटकार मारले आहेत.

२) कायरन पोलार्ड (Kieron Pollard) :

या यादीत दुसऱ्या स्थानी देखील वेस्ट इंडिज संघाचा फलंदाज आहे. मुंबई इंडियन्स संघाला ५ वेळेस जेतेपद मिळवून देण्यात कायरन पोलार्डने मोलाची भूमिका बजावली आहे. पोलार्ड फलंदाजीला आला की, गोलंदाज थरथर कापतात. जगातील कुठल्याही स्टेडियमची सीमारेषा ही त्याच्यासमोर छोटी दिसू लागते. त्याने आतापर्यंत टी -२० क्रिकेटमध्ये ५७९ सामन्यांमध्ये ७६४ षटकार मारले आहेत.

) आंद्रे रसल (Andre russel) :

टी -२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारणाऱ्या फलंदाजांच्या यादीत आंद्रे रसल हे नाव तिसऱ्या स्थानी आहे. आंद्रे रसल हा किती विस्फोटक फलंदाज आहे, हे संपूर्ण क्रिकेट विश्वाने पाहिले आहे. गोलंदाजाने वेगवान चेंडू टाकला तर हा फलंदाज दुप्पट वेगाने तो चेंडू स्टेडियमच्या बाहेर पोहचवतो. अनेकदा षटकार मारून त्याने आपल्या संघाला विजय मिळवून दिला आहे. त्याने आतापर्यंत टी -२० क्रिकेटमध्ये एकूण ५१७ षटकार मारले आहेत.

) ब्रेंडन मॅक्क्युलम (Brendon McCullum) :

या यादीत चौथ्या स्थानी आहे न्यूझीलंडचा दिग्गज फलंदाज ब्रेंडन मॅक्क्युलम. कसोटी क्रिकेट असो,वनडे क्रिकेट असो किंवा टी -२० क्रिकेट. या फलंदाजाने कधीच गोलंदाजांवर आक्रमण करणं सोडलं नाही. टी -२० क्रिकेटबद्दल बोलायचं झालं तर, त्याने आयपीएल स्पर्धेत कोलकाता आणि बेंगलोर सारख्या संघांचे प्रतिनिधित्व केले आहे. आयपीएलच्या पहिल्याच सामन्यात त्याने १५८ धावांची खेळी केली होती. त्याने आपल्या टी -२० कारकिर्दीत एकूण ४८५ षटकार मारले आहेत. 

) शेन वॉटसन (Shane Watson) :

शेन वॉटसनने २००२ मध्ये ऑस्ट्रेलिया संघासाठी आपला पहिला सामना खेळला होता. सुरुवातीपासूनच तो एक आक्रमक फलंदाज आहे. अनेकदा त्याने चौकार आणि षटकारांचा पाऊस पाडून ऑस्ट्रेलिया संघाला विजय मिळवून दिला आहे. त्याच्या षटकारांबद्दल बोलायचं झालं तर त्याने आतापर्यंत एकूण ४६७ षटकार मारले आहेत.

काय वाटतं? कोण असेल तो फलंदाज जो ख्रिस गेलचा सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम मोडून काढेल? कमेंट करून नक्की कळवा.

सबस्क्राईब करा

* indicates required