"भाऊ तु आता रिटायरमेंट घे.." संजू सॅमसनवर दुर्लक्ष केल्याने भडकले चाहते, दिल्या अशा प्रतिक्रीया...

भारत आणि इंग्लंड (India vs England) या दोन्ही संघांमध्ये पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील अंतिम सामन्याला सुरुवात झाली आहे. या मालिकेत भारतीय संघ २-१ ने आघाडीवर आहे. त्यामुळे हा सामना जिंकला किंवा ड्रॉ केला तरी देखील भारतीय संघ मालिका आपल्या नावावर करणार आहे. ही मालिका झाल्यानंतर दोन्ही संघांमध्ये ३ वनडे आणि ३ टी -२० सामन्यांची मालिका पार पडणार आहे. या मालिकेसाठी बीसीसीआयने भारतीय संघाची घोषणा केली आहे. मात्र बीसीसीआयने निवडलेल्या संघात संजू सॅमसनला (Sanju Samson) संधी देण्यात आली नाहीये. ज्यामुळे क्रिकेट चाहते भलतेच चिडले आहेत.

इंग्लंड विरुद्ध होणाऱ्या टी -२० मालिकेसाठी बीसीसीआयने दोन वेगवेगळ्या संघांची घोषणा केली आहे. पहिल्या टी -२० सामन्यासाठी वेगळा आणि उर्वरित दोन टी -२० सामन्यासाठी वेगळ्या संघाची घोषणा करण्यात आली आहे. पहिल्या टी -२० सामन्यासाठी विराट कोहली, रिषभ पंत आणि जसप्रीत बुमराह सारख्या खेळाडूंना विश्रांती देण्यात आली आहे. तर उर्वरित दोन सामन्यात हे खेळाडू पुनरागमन करणार आहेत. त्यामुळे संजू सॅमसन आणि ऋतुराज गायकवाड सारख्या खेळाडूंना संघाबाहेर करण्यात येणार आहे. नुकताच आयर्लंडविरुद्ध झालेल्या टी -२० मालिकेत संजू सॅमसन चांगलाच चमकला होता. त्याने दुसऱ्या टी -२० सामन्यात ७७ धावांची तुफानी खेळी केली होती. तरीदेखील इंग्लंडविरुद्ध होणाऱ्या पहिल्या टी -२० सामन्यात त्याची पर्यायी खेळाडू म्हणून निवड करण्यात आली आहे.

क्रिकेट चाहत्यांनी सोशल मीडियावर दिल्या अशा प्रतिक्रीया..

संपुर्ण मालिकेसाठी संजू सॅमसनची निवड न झाल्याने क्रिकेट चाहते भलतेच चिडले आहेत. तर गेल्या काही सामन्यांमध्ये फ्लॉप ठरलेल्या श्रेयस अय्यरला दुसऱ्या आणि तिसऱ्या सामन्यासाठी संघात स्थान देण्यात आले आहे. संजू सॅमसन सतत चांगली कामगिरी करून स्वतः ला सिद्ध करतोय मात्र निवडकर्ते त्याच्यावर दुर्लक्ष करताय. त्यामुळे सोशल मीडियावर चाहत्यांनी ट्विट करत संताप व्यक्त केला आहे. एका युजरने ट्विट करत लिहिले की, "भारतीय संघात रिषभ पंत आणि दिनेश कार्तिक सारख्या खेळाडूंना संधी दिली जातेय आणि संजू सॅमसनला संघाबाहेर केलं जातंय. भारतीय संघ असा टी -२० विश्वचषक जिंकू शकत नाही." तर दुसऱ्या एका युजरने लिहिले की, "संजू सॅमसनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त व्हाव आणि ऑस्ट्रेलिया, इंग्लंड संघासाठी खेळावं."

पहिल्या टी -२० साठी असा आहे भारतीय संघ

 रोहित शर्मा (कर्णधार), इशान किशन, ऋतुराज गायकवाड, संजू सॅमसन, सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, राहुल त्रिपाठी, दिनेश कार्तिक (यष्टिरक्षक), हार्दिक पंड्या, व्यंकटेश अय्यर, युजवेंद्र चहल, अक्षर पटेल, रवी बिश्नोई, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल , आवेश खान, अर्शदीप सिंग, उमरान मलिक.

दुसऱ्या आणि तिसऱ्या टी -२० साठी असा आहे भारतीय संघ

 रोहित शर्मा (कर्णधार), इशान किशन, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, श्रेयस अय्यर, दिनेश कार्तिक (यष्टिरक्षक), ऋषभ पंत (यष्टिरक्षक), हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, युजवेंद्र चहल, अक्षर पटेल, रवी बिश्नोई, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार, आवेश खान, हर्षल पटेल, उमरान मलिक.

संजू सॅमसनने २०१५ मध्ये भारतीय संघात पदार्पण केलं होतं. पदार्पण करून ७ वर्ष उलटली आहेत तरीदेखील त्याला भारतीय संघात स्थान निर्माण करता आलं नाहीये. यामागे मुख्य कारण काय आहे? संजू सॅमसनचा फॉर्म की निवडकर्ते? तुम्हाला काय वाटतं? कमेंट करून नक्की कळवा.

सबस्क्राईब करा

* indicates required