क्लास ऑफ धोनी! एमएस धोनीच्या नेतृत्वाखाली पदार्पण केलेले हे ६ खेळाडू झाले आहेत भारताचे कर्णधार; पाहा यादी...

अब्जावधी लोकसंख्या असलेल्या भारत अनेक असे खेळाडू आहेत जे आंतरराष्ट्रीय संघात स्थान मिळवण्याच्या प्रयत्नात आहेत. मात्र संधी ही काही मोजक्याच खेळाडूंना मिळत असते. क्रिकेटबद्दल बोलायचं झालं तर, कोट्यवधी खेळाडूंमधून केवळ १५ खेळाडूंची भारतीय संघात निवड केली जाते. उर्वरित खेळाडू आयपीएल, रणजी ट्रॉफी स्पर्धा खेळत असतात. जे खेळाडू भारतासाठी खेळतात त्यांना संघात टिकून राहण्यासाठी काहीतरी खास करावं लागतं. सचिन तेंडुलकर, वीरेंद्र सेहवाग, राहुल द्रविड, सुनील गावस्कर आणि कपिल देव सारखे खेळाडू होऊन गेले ज्यांना भारतीय क्रिकेटमध्ये मानाचं स्थान दिले गेलं आहे. (Indian captains who played under ms dhoni)

तर आयसीसीच्या तीनही मानाच्या स्पर्धा जिंकणारा कर्णधार एमएस धोनी (Ms dhoni) जरा खास आहे. भारतीय संघाचे नेतृत्व करताना त्याने भविष्यासाठी कर्णधार देखील घडवले. नुकताच इंग्लंड विरुद्ध सुरू असलेल्या अंतिम कसोटी सामन्यात रोहित शर्माच्या अनुपस्थितीत जसप्रीत बुमराहला (Jasprit bumrah) संघाची जबाबदारी देण्यात आली आहे. तो दुसरा भारतीय वेगवान गोलंदाज ठरला आहे, ज्याने भारतीय कसोटी संघाचे नेतृत्व केले आहे. मात्र अनेकांना ही बाब माहीत नसेल की, एमएस धोनीच्या नेतृत्वाखाली पदार्पण करून भारतीय संघाचे नेतृत्व करणारा जसप्रीत बुमराह हा सहावा कर्णधार आहे. कोण आहेत सुरुवातीचे ५ कर्णधार? चला पाहूया.

) विराट कोहली (Virat Kohli) :

एमएस धोनीने निवृत्ती जाहीर केल्यानंतर विराट कोहलीला भारतीय संघाचे कर्णधारपद देण्यात आले होते. ही जबाबदारी त्याने योग्यरित्या पार पाडली. एक उत्कृष्ट कर्णधार म्हणून त्याने आपल्या वेगळी ओळख निर्माण केली. २००८ मध्ये त्याने एमएस धोनीच्या नेतृत्वाखाली पहिला सामना खेळला होता. त्याने २१३ सामन्यांमध्ये भारतीय संघाचे नेतृत्व केले. यादरम्यान त्याने १३५ सामन्यांमध्ये भारतीय संघाला विजय मिळवून दिला.

२) रोहित शर्मा (Rohit Sharma)

एमएस धोनीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने २००७ टी -२० विश्वचषक स्पर्धेचे जेतेपद पटकावले होते. या स्पर्धेत रोहित शर्माने देखील मोलाची भूमिका बजावली होती. तेव्हापासून तो भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करतोय. दरम्यान विराट कोहलीने कर्णधारपदाचा राजीनामा दिल्यानंतर रोहित शर्माला तिन्ही फॉरमॅटमध्ये भारतीय संघाचे कर्णधारपद देण्यात आले होते.

३) हार्दिक पंड्या (Hardik pandya) :

हार्दिक पंड्याने नुकताच आयपीएल २०२२ स्पर्धेत आपल्या नेतृत्वाखाली गुजरात टायटन्स संघाला जेतेपद मिळवून दिले होते. त्याने २०१६ मध्ये एमएस धोनीच्या नेतृत्वाखाली खेळताना भारतीय संघात पदार्पण केले होते. तसेच त्याची आयपीएल स्पर्धेतील कामगिरी पाहता त्याला भारतीय संघाचे कर्णधारपद देण्यात आले होते. नुकताच आयर्लंड विरुद्ध झालेल्या टी -२० मालिकेत त्याने भारतीय संघाचे नेतृत्व केले आणि भारतीय संघाला २-० ने जोरदार विजय मिळवून दिला.

) अजिंक्य रहाणे (Ajinkya rahane)

अजिंक्य रहाणे याने २०११ मध्ये एमएस धोनीच्या नेतृत्वाखाली पदार्पण केले होते. त्याला इंग्लंडमध्ये पदार्पण करण्याची संधी मिळाली होती. त्याने बरीच वर्ष भारतीय संघाच्या उपकर्णधारपदाची जबाबदारी पार पाडली. मात्र जेव्हा नेतृत्व करण्याची जबाबदारी मिळाली त्यावेळी त्याने ऑस्ट्रेलिया संघाला ऑस्ट्रेलियामध्ये पराभूत करत इतिहास रचला.

) शिखर धवन (Shikhar Dhawan) :

एमएस धोनीच्या नेतृत्वाखाली खेळताना २०१० मध्ये शिखर धवनने ऑस्ट्रेलिया संघाविरुद्ध पदार्पण केले होते. गतवर्षी श्रीलंका संघाविरुद्ध झालेल्या मर्यादित षटकांच्या मालिकेसाठी त्याची भारतीय संघाच्या कर्णधारपदी नियुक्ती करण्यात आली होती. 

काय वाटतं? एमएस धोनी नंतर भारतीय संघाला विश्वचषक स्पर्धा जिंकून देणारा कर्णधार कोण असेल? कमेंट करून नक्की कळवा.

सबस्क्राईब करा

* indicates required