संपुर्ण वनडे कारकिर्दीत एकही शतक झळकावता न आलेले फलंदाज; अनेक दिग्गज खेळाडूंचा समावेश..

क्रिकेट बद्दल बोलताना आपण वेगवेगळ्या विक्रणांबद्दक बोलत असतो. आता वन डे क्रिकेट आणि शतकांचा उल्लेख केला तर कोणता विक्रम तुम्हाला आठवतो? अर्थातच सचिनच्या ४९ शतकांचा, सचिन जरी शतकांचा बादशाह असला तरी या लेखाचा विषय तो नाही. आज आपण अशा काही खेळाडू बद्दल बोलणार आहोत जे प्रसिद्ध तर आहेत पण त्यांना आपल्या वन डे कारकीर्दीत एकही शतक झळवता आले नाही. आठवतायत का काही नावं. चला तर मग ही यादी वाचून घ्या

) इयान बोथम (Ian Botham) : 

इंग्लंड संघाचा स्टार खेळाडू इयान बोथम याने १९७६ मध्ये वेस्ट इंडिज विरुध्द झालेल्या वनडे मालिकेत पदार्पण केले होते. त्याने आपल्या वनडे कारकिर्दीत एकूण ११६ सामने खेळले. ज्यात त्याने २३.२१ च्या सरासरीने २११३ धावा केल्या. यादरम्यान त्याने ९ अर्धशतके झळकावली. मात्र संपूर्ण क्रिकेट कारकिर्दीत त्याला वनडे क्रिकेटमध्ये एकही शतक झळकावता आले नाही.

) मिस्बाह उल् हक (Misbah ul haq):

मिस्बाह उल् हक हा पाकिस्तान संघातील दिग्गज खेळाडूंपैकी एक आहे. मात्र तो देखील त्या कमी नशीबवान खेळाडूंच्या यादीत आहे ज्यांना, वनडे क्रिकेटमध्ये एकही शतक झळकवता आले नाही. पाकिस्तान संघातील दिग्गज म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मिस्बाह उल् हकने एकूण १६२ वनडे सामने खेळले. ज्यात त्याने ४३.४० च्या सरासरीने ५१२२ धावा केल्या होत्या. यादरम्यान त्याने ४२ अर्धशतके झळकावली. मात्र त्याला एकही शतक पूर्ण करता आलं नाही. 

) ग्राहम थोरपे (Graham Thorpe) :

इंग्लंड संघातील स्टार खेळाडू ग्राहम थोरपे हा त्या काळचा दिग्गज खेळाडू होता. १९९३ मध्ये त्याने ऑस्ट्रेलिया संघाविरुद्ध झालेल्या सामन्यात पदार्पण केले होते. आपल्या संपूर्ण क्रिकेट कारकिर्दीत त्याने एकूण ८२ वनडे सामने खेळले होते. ज्यामध्ये त्याने ३७.१८ च्या सरासरीने २३८० धावा केल्या होत्या. यादरम्यान त्याने २७ अर्धशतक झळकावले होते. मात्र दुर्दैवाने त्याला एकही शतक झळकावता आले नव्हते.

४) ड्वेन स्मिथ (Dwayne Smith) :

वेस्ट इंडिज संघातील विस्फोटक फलंदाज ड्वेन स्मिथ आपल्या आक्रमक फलंदाजीसाठी ओळखला जातो. त्याने आपल्या वनडे कारकिर्दीत एकूण १०५ सामने खेळले. ज्यात त्याने १८.५७ च्या सरासरीने १५६० धावा केल्या. यादरम्यान त्याने ८ अर्धशतके झळकावली होती. मात्र त्याला एकही शतक झलकावता आले नव्हते.

) चमारा kalugedara (Chamara kapugedara) :

श्रीलंका संघातील फलंदाज चमारा कपुगेदरा या यादीत पाचव्या स्थानी आहे. चमारा कपुगेदराला देखील आपल्या वनडे कारकिर्दीत एकही शतक झळकावता आले नव्हते. त्याने आपल्या वनडे कारकिर्दीत १०२ सामने खेळले. ज्यात त्याने २१.०९ सरासरीने १६२४ धावा केल्या होत्या. यादरम्यान त्याने ८ अर्धशतक झळकावले होते. तर एकही शतक झळकावता आले नव्हते.

सबस्क्राईब करा

* indicates required