निस्वार्थ क्रिकेटपटू!! कारकिर्दीच्या शिखरावर असताना या ५ क्रिकेटपटूंनी घेतला निवृत्त होण्याचा निर्णय..

क्रिकेटमध्ये बहुतांश असे खेळाडू आहेत ज्यांनी ३५ वयानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटला राम राम करण्याचा निर्णय घेतला. एकदा वय झालं की, फिटनेस हवी तितकी साथ देत नाही. त्यामुळे खेळाडूंना टोकाची भूमिका घ्यावी लागते. कारकिर्दीच्या शिखरावर असताना एखाद्या खेळाडूने निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतल्याचे क्वचितच पाहायला मिळते. या लेखाच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला अशा ५ क्रिकेटपटूंबद्दल माहिती देणार आहोत, ज्यांनी आपल्या कारकिर्दीच्या शिखरावर असताना निवृत्त होण्याचा निर्णय घेतला.

१) कुमार संगकारा (Kumar Sangakkara) :

श्रीलंका संघाचा दिग्गज फलंदाज कुमार संगकाराने जेव्हा आंतरराष्ट्रीय क्रिकेटला राम राम केले, त्यावेळी त्याच्या कारकिर्दीतील सुवर्णकाळ सुरू होता. आयसीसी वनडे विश्वचषक २०१५ स्पर्धेत तो दुसरा सर्वाधिक धावा करणारा फलंदाज होता. यासह त्याने याच स्पर्धेत ४ शतके देखील झळकावली होती. मात्र हेच वर्ष त्याच्या क्रिकेट कारकिर्दीतील शेवटचे वर्ष ठरले. त्याने २०१५ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटला राम राम केले.

२) ग्लेन मॅकग्राथ (Glenn McGrath) :

 ऑस्ट्रेलिया संघाचा वेगवान गोलंदाज ग्लेन मॅकग्राथने आपल्या गोलंदाजीच्या जोरावर अनेक दिग्गज फलंदाजांना माघारी धाडले.  १२४ कसोटी सामने आणि २५० वनडे सामने खेळणाऱ्या या गोलंदाजाने २००७ मध्ये आपला शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता. मुख्य बाब म्हणजे ज्यावेळी त्याने निवृत्ती जाहीर केली, त्यावेळी देखील तो उत्कृष्ट गोलंदाजी करत होता.

३) सौरव गांगुली (Sourav Ganguly) :

भारतीय संघाचा दिग्गज फलंदाज सौरव गांगुली याने आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील शेवटचा सामना २००७ मध्ये पाकिस्तान संघाविरुद्ध खेळला होता. २००७ मध्ये तो सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत पाचव्या स्थानी होता. तरीदेखील त्याने टोकाची भूमिका घेत वनडे क्रिकेटला राम राम करण्याचा निर्णय घेतला होता.

४) ब्रेंडन मॅक्क्यूलम  (Brendon McCullum) :

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सर्वात विस्फोटक फलंदाजांपैकी एक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ब्रेंडन मॅक्क्यूलमने आपला शेवटचा सामना २० फेब्रुवारी २०१६ रोजी ऑस्ट्रेलिया संघाविरुद्ध खेळला होता. आंतरराष्ट्रीय क्रिकेटला राम राम केल्यानंतर देखील त्याने २ वर्षे आयपीएल स्पर्धा खेळली. या स्पर्धेत त्याने धावा देखील केल्या होत्या.

५) एबी डीविलियर्स (Ab devilliers) :

दक्षिण आफ्रिकेचा दिग्गज फलंदाज एबी डीविलियर्सने आपला शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना २०१८ मध्ये खेळला होता. एबी डीविलियर्सने देखील आंतरराष्ट्रीय क्रिकेटला राम राम केल्यानंतर २०२१ पर्यंत आयपीएल स्पर्धेत रॉयल चॅलेंजर्स बंगलोर संघाचे प्रतिनिधित्व केले. यादरम्यान त्याने धावांचा पाऊस पाडला होता. एबी डीविलियर्सच्या या निर्णयामुळे क्रिकेट चाहत्यांना जोरदार धक्का बसला होता. 

या पाचही क्रिकेटपटूंनी आपल्या संघासाठी महत्वाची भूमिका बजावली होती. मात्र स्वतःचा विचार न करता त्यांनी संघासाठी निवृत्त होण्याचा निर्णय घेतला होता.

सबस्क्राईब करा

* indicates required