WPL च्या लिलावात कोणत्या ५ खेळाडूंवर लागली सर्वाधिक बोली; पाहा इथे

नुकताच विमेन्स प्रीमियर लीग २०२३ स्पर्धेसाठीचा लिलाव सोहळा मुंबईत पार पडला. या लिलावात ५ फ्रांचायझींनी ८७ खेळाडूंवर पैशांचा पाऊस पाडत आपल्या संघात सामील केले. या ८७ खेळाडूंपैकी ५७ भारतीय तर ३० परदेशी खेळाडू होत्या. सर्वात मोठी बोली लागण्याच्या बाबतीत भारतीय खेळाडू अव्वल आहेत. तर ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंनी देखील मोठी रक्कम मिळवली. बोभाटाच्या या लेखात आम्ही तुम्हाला या लिलावाततील सर्वात महागड्या खेळाडूंबद्दल माहिती देणार आहोत.

) स्मृती मंधाना :

भारतीय संघाची उपकर्णधार आणि सलामीवीर फलंदाज स्मृती मंधाना ही विमेन्स प्रीमियर लीग २०२३ लिलावातील सर्वात महागडी खेळाडू ठरली. या लिलावात पाहिली बोली तिच्यावरच लागली. रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरने तिला ४.५ कोटींची बोली लावत आपल्या संघात स्थान दिले. तिची मूळ किंमत ५० लाख रुपये होती. या लिलावात तिला ७ पट जास्त रक्कम मिळाली. तसेच मुंबईने तिला आपल्या ताफ्यात घेण्याचा प्रयत्न केला मात्र रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरने बाजी मारली.

) एशले गार्डनर :

ऑस्ट्रेलिया संघातील धाकड अष्टपैलू एशले गार्डनरवर देखील मोठी बोली लागली. गुजरात जायंट्सने तिला ३.२ कोटींची बोली लावत आपल्या संघात स्थान दिले. तिची मूळ किंमत ५० लाख रुपये होती. युपी वॉरियर्स आणि मुंबई इंडियन्स देखील या शर्यतीत होते, मात्र शेवटी गुजरातने बाजी मारली.

) नताली सिवर :

इंग्लंडची अष्टपैलू खेळाडू नताली सिवरला मुंबई इंडियन्सने ३.२ कोटींची बोली लावत आपल्या संघात स्थान दिले. ती या लिलावातील तिसरी सर्वात महागडी खेळाडू ठरली आहे. तिला आपल्या संघात स्थान देण्यासाठी युपी आणि दिल्लीमध्ये स्पर्धा पाहायला मिळाली. अखेर मुंबईने बाजी मारली आणि तिला आपल्या संघात स्थान दिले.

) दीप्ती शर्मा:

भारतीय संघातील युवा अष्टपैलू खेळाडू दीप्ती शर्माला देखील या लिलावात मोठी रक्कम मिळाली. तिची मूळ किंमत ५० लाख रुपये होती. तर युपी वॉरियर्सने तिला तब्बल २.६० कोटींची बोली लावत आपल्या संघात स्थान दिले होते. मुंबई इंडियन्स आणि गुजरात टायटन्समध्ये देखील दीप्तीला आपल्या संघात स्थान देण्यासाठी चढाओढ सुरू होती. अखेर युपीने बाजी मारली.

) जेमीमा रॉड्रिग्ज

नुकताच जेमीमाने भारतीय महिला संघाला पाकिस्तान विरुध्द झालेल्या सामन्यात जोरदार विजय मिळवून दिला होता. तिची ही चमकदार कामगिरी पाहता तिच्यावर पैशांचा पाऊस पाडला गेला आहे. लिलावात ती पाचवी सर्वात महागडी खेळाडू ठरली. तिला दिल्ली कॅपिटल्सने २.३ कोटींची बोली लावत आपल्या संघात स्थान दिले.

भारतीय संघासाठी टी -२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारी फलंदाज कोण आहे माहितेय का? कमेंट करून नक्की कळवा.

सबस्क्राईब करा

* indicates required