भारताला उपांत्य फेरीत पोहचवणारे टॉप -४ खेळाडू!! विराट अन् सूर्याचा राहिलाय मोलाचा वाटा...

आयसीसी टी -२० विश्वचषक २०२२ स्पर्धेत भारतीय संघ सध्या जोरदार कामगिरी करतोय. भारतीय संघाने या स्पर्धेतील सेमी फायनलमध्ये प्रवेश केला आहे. एक वर्षापूर्वी म्हणजेच आयसीसी टी -२० विश्वचषक २०२१ स्पर्धेत विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाला साखळी फेरीतून बाहेर व्हावे लागले होते. त्यानंतर रोहित शर्माला संघाची जबाबदारी मिळाली आणि त्याने संघाला सेमीफायनलमध्ये पोहचवले आहे. या लेखातून आम्ही तुम्हाला अशा ४ खेळाडूंबद्दल माहिती देणार आहोत, ज्यांनी भारतीय संघाला सेमी फायनलमध्ये पोहचवण्यात मोलाची भूमिका बजावली आहे.

) मोहम्मद शमी (Mohammad shami) :

गतवर्षी झालेल्या टी -२० विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाला पाकिस्तान संघाकडून पराभवाचा सामना करावा लागला होता. या सामन्यात मोहम्मद शमीने ३.५ षटकात ४३ धावा खर्च केल्या होत्या. या निराशाजनक कामगिरी नंतर त्याला सोशल मीडियावर ट्रोल केलं गेलं होतं. त्यानंतर शमीला कोरोनाची लागण झाली आणि तो संघाबाहेर झाला होता. नुकताच त्याने संघात पुनरागमन केले आणि संघाला सेमी फायनलमध्ये पोहचवण्यात मोलाची भूमिका बजावली. 

मोहम्मद शमीने जास्त विकेट्स घेतल्या नाहीये. मात्र त्याने ज्याप्रकारे संघाची जबाबदारी घेत गोलंदाजी केली आहे ते कौतुकास्पद आहे. भारत पाकिस्तान सामन्यात मोहम्मद शमीने इफ्तिखार अहमदला बाद करत भारताला सामन्यात पुनरागमन करून दिले होते.

) सूर्यकुमार यादव (Suryakumar yadav) :

सूर्यकुमार यादव यावर्षी जोरदार फॉर्ममध्ये आहे. नुकताच त्याने टी -२० क्रिकेटमध्ये एकाच वर्षात १००० धावा करण्याचा पराक्रम केला आहे. असा पराक्रम करणारा तो दुसरा फलंदाज ठरला आहे. इतकेच नव्हे तर तो आयसीसी टी -२० फलंदाजांच्या यादीत पहिल्या स्थानी आहे. 

भारताचा मिस्टर ३६० म्हणून ओळखला जाणारा सूर्यकुमार यादव मैदानाच्या चारही बाजूंना शॉट्स खेळण्यात तरबेज आहे. पाकिस्तान विरुध्द त्याला हवी तशी कामगिरी करता आली नव्हती. मात्र दक्षिण आफ्रिका, झिम्बाब्वे आणि नेदरलँड संघाविरुद्ध झालेल्या सामन्यात त्याने तुफानी खेळी केली. त्याच्या या खेळीच्या जोरावर भारतीय संघाने सेमी फायनलमध्ये प्रवेश केला आहे.

) अर्शदीप सिंग (Arshdeep singh) :

आशिया चषक २०२२ स्पर्धेत पाकिस्तान विरुध्द झालेल्या सामन्यात अर्शदीप सिंगने एक झेल सोडल्यामुळे भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला होता. हा झेल सोडल्यानंतर अर्शदीप सिंगला देखील ट्रोल करण्यात आले होते. मात्र आयसीसी टी -२० विश्वचषक २०२२ स्पर्धेत त्याने अप्रतिम गोलंदाजी करत ट्रोल करणाऱ्यांना सडेतोड उत्तर दिले आहे. पाकिस्तान विरुध्द झालेल्या सामन्यात त्याने पहिल्याच चेंडूवर बाबर आजमला बाद करत माघारी धाडले होते. त्यानंतर मोहम्मद रिजवान आणि आसिफ अलीला देखील पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला होता.

अर्शदीप सिंग सुरुवातीच्या आणि अंतिम षटकांमध्ये देखील अप्रतिम गोलंदाजी करत भारतीय संघाला विजय मिळवून देत आहे. या स्पर्धेतून जसप्रीत बुमराह बाहेर झाल्यानंतर भारतीय संघाची चिंता वाढली होती. मात्र अर्शदीप सिंगने त्याची जागा भरून काढली आहे.

) विराट कोहली (Virat Kohli) :

आशिया चषक २०२२ स्पर्धा सुरू होण्यापूर्वी विराटला संघाबाहेर करण्याची मागणी जोर धरत होती. मात्र या स्पर्धेत जोरदार पुनरागमन करत त्याने आयसीसी टी -२० विश्वचषक २०२२ स्पर्धेत देखील चांगली कामगिरी करून दाखवली आहे. पाकिस्तान विरुध्द झालेल्या सामन्यात जेव्हा भारतीय संघ बॅकफूटवर होता. त्यावेळी विराट कोहलीने जोरदार फलंदाजी करत भारताला सामना जिंकून दिला होता. त्यानंतर नेदरलँड संघाविरुद्ध झालेल्या सामन्यात ६२ आणि बांगलादेश विरुध्द झालेल्या सामन्यात त्याने ६४ धावांची खेळी केली. अशीच कामगिरी त्याला सेमी फायनल आणि फायनलमध्ये देखील करावी लागणार आहे.

सबस्क्राईब करा

* indicates required