प्रतीमहिना ८० हजारने केली सुरुवात, आज आहे कोट्यवधींचा मालक! जाणून घ्या सूर्याच्या एकूण संपत्तीबद्दल...

ऑस्ट्रेलियामध्ये सुरू असलेल्या आयसीसी टी -२० विश्वचषक २०२२ स्पर्धेत सूर्यकुमार यादव सध्या जोरदार कामगिरी करतोय. त्याच्या आक्रमक खेळी मुळे तो सध्या सर्वत्र चर्चेचा विषय ठरतोय. त्याने यावर्षी टी -२० क्रिकेटमध्ये धावांचा पाऊस पाडला आहे. सध्या तो आयसीसी टी -२० फलंदाजांच्या यादीत पहिल्या स्थानी विराजमान आहे. साखळी फेरीतील शेवटच्या सामन्यात त्याने अवघ्या २५ चेंडूंमध्ये नाबाद ६१ धावांची खेळी केली होती. या खेळीनंतर सोशल मीडियावर सूर्यकुमार यादवची हवा सुरू आहे. सूर्यकुमार यादवच्या बॅटमधून जसजशा धावा निघत आहेत, तशाच प्रकारे त्याची कमाईतही वाढ होत आहे.
आयपीएल मधून केली कमाई करायला सुरुवात..
सूर्यकुमार यादवने कमाई करण्याची सुरुवात आयपीएल स्पर्धेपासून केली होती. त्यावेळी त्याला केवळ १० लाख रुपये मिळायचे. आता २०२२ मध्ये तो तब्बल ८ कोटी रुपयांची कमाई करतोय. आयपीएल स्पर्धेत तो मुंबई इंडियन्स संघाचे प्रतिनिधित्व करतो. २०१३ पर्यंत त्याला १० लाख रुपये मानधन मिळायचे. म्हणजे प्रत्येक महिन्याला केवळ ८० हजार रुपये. मात्र आता त्याची एकूण संपत्ती ३२ कोटी रुपयांच्या आसपास आहे.
सूर्यकुमार यादव अनेक छोट्या मोठ्या ब्रँड्सचा ब्रँड ॲम्बेसेडर आहे. तो ड्रीम ईलेव्हेन आणि फ्री हिट सारख्या लोकप्रिय फॅन्टसी स्पोर्ट्स ॲप्सचा ब्रँड ॲम्बेसेडर आहे. तसेच तो मॅक्सिमा घड्याळे, सरीन स्पोर्ट्स, नीमन शूज, झेब्रॉनिक्स, गोनोइस आणि इतर अनेक ब्रँड्सचे देखील प्रमोशन करताना दिसून येत असतो. यामधून देखील तो लाखोंची कमाई करतो. सूर्यकुमार यादव चेंबूर येथील अणुशक्ती नगर येथे असलेल्या आलिशान घरात राहतो.
सूर्यकुमार यादवकडे हायस्पीड कारचे कलेक्शन आहे. नुकताच त्याच्या कार कलेक्शनमध्ये मर्सिडीज-बेंझ जीएलई कूपचा समावेश झाला आहे. या आलिशान कारची किंमत सुमारे २.१५ कोटी रुपये इतकी आहे. ही कार दोन व्हेरियेंटमध्ये उपलब्ध आहे. पहिला व्हेरियेंट म्हणजे एएमजी जीएलई ५३ ४ मॅटिक आहे, ज्याची किंमत १.५५ कोटी रुपये इतकी आहे आणि दुसरा व्हेरियेंट एएमजी जीएलई ६३ एस ४ मॅटिक आहे, ज्याची किंमत २.१५ कोटी रुपये आहे.
तसेच त्याच्या कार कलेक्शनमध्ये निसान जोंगा १५ लाख रुपये, रेंज रोव्हर वेलार ९० लाख रुपये, मिनी कूपर एस आणि ६० लाख रुपये किंमतीची ऑडी ए ६ सारख्या कारचा देखील समावेश आहे. सूर्यकुमार यादवला कारशिवाय स्पोर्ट्स बाइक्सचाही शौक आहे. रिपोर्ट्सनुसार, त्याच्याकडे सुझुकी हायाबुसा आणि हार्ले-डेव्हिडसन सारख्या महागड्या बाइक्सही आहेत.