रिषभ पंत की दिनेश कार्तिक? कोणाला मिळेल संधी? कशी असेल भारताची प्लेइंग ११? वाचा..

आयसीसी टी -२० विश्वचषक २०२२ स्पर्धा आता शेवटच्या टप्प्यात पोहोचली आहे. न्यूझीलंड संघाला सेमी फायनलमध्ये पराभूत करत पाकिस्तान संघाने अंतिम सामन्यात धडक दिली आहे. आता इंग्लंड आणि भारत या दोन संघांपैकी कुठला संघ अंतिम फेरीत प्रवेश करणार यावर सर्वांचे लक्ष लागून असणार आहे. तर अनेकांना असाही प्रश्न पडला असेल की, या महत्वाच्या सामन्यात भारतीय संघाची प्लेइंग ११ कशी असेल. चला तर पाहूया.

भारतीय संघाचा सेमी फायनलचा सामना बलाढ्य इंग्लंड संघाविरुद्ध पार पडणार आहे. या सामन्यासाठी दोन्ही संघ कसून सराव करत आहेत. कारण विजेता संघाला थेट अंतिम सामन्याचे तिकीट मिळणार आहे. एकीकडे इंग्लंड संघाची देखील चिंता वाढत आहे. कारण डेविड मलान मार्क वूड दुखापतग्रस्त आहेत. तर दुसरीकडे भारतीय संघ यष्टिरक्षक फलंदाज म्हणून कोणाला संघात स्थान देणार ? रिषभ पंत की दिनेश कार्तिक.

झिम्बाब्वे विरुध्द झालेल्या साखळी फेरीतील शेवटच्या सामन्यात रिषभ पंतला संघात स्थान देण्यात आले होते. दिनेश कार्तिक दुखापतीमुळे संघाबाहेर झाला होता. त्यामुळे असा अंदाज व्यक्त केला जात आहे की, इंग्लंड विरुध्द होणाऱ्या सामन्यात देखील भारतीय संघ कुठलाही बदल करण्याच्या प्रयत्नात नसणार आहे. कारण या सामन्यापूर्वी सुरू असलेल्या सराव सत्रात रिषभ पंत नेट्समध्ये जोरदार फलंदाजी करताना दिसून आला आहे.

दिनेश कार्तिकला फिमिशरची भूमिका पार पाडण्यासाठी संघात संधी दिली गेली होती. मात्र त्याला हवी तशी कामगिरी करता आली नाहीये. आतापर्यंत या स्पर्धेतील ४ सामन्यांमध्ये त्याने केवळ १४ धावा केल्या आहेत. त्यामुळे दिनेश कार्तिक ऐवजी रिषभ पंतला संधी दिली जाऊ शकते. 

इंग्लंड विरुद्ध होणाऱ्या सामन्यासाठी अशी असू शकते भारतीय संघाची प्लेइंग ११

रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, रिषभ पंत (यष्टिरक्षक), हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, आर अश्विन, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी, अर्शदीप सिंग.

सबस्क्राईब करा

* indicates required