विदर्भाच्या पोट्ट्यांनी रचला इतिहास, जाणून घ्या किती खेळयांनंतर जिंकली ही टीम !!

सगळा देश थर्टीफर्स्टची जय्यत तयारी करत असताना आपले विदर्भाचे पठ्ठे रणजी ट्रॉफीसाठी लढत होते. दिल्ली विरुद्ध विदर्भ अशी ही लढत होती आणि पहिल्यांदाच विदर्भाने यात बाजी मारलीय. विदर्भाच्या टीमने ही लढत जिंकून वर्षाचा शेवट शानदार केलाय राव. पहिल्यांदाच रणजी ट्रॉफी आपल्या विदर्भाच्या नावावर झाली आहे.

विदर्भाच्या टीमने ज्या संघाविरुद्ध हा सामना जिंकला तेही काही लेचेपेचे नव्हते. दिल्लीची टीम रणजीमध्ये तेवढ्याच ताकदीने उतरली होती पण विदर्भाने त्यांना चक्क ९ विकेट्सने घरी पाठवलं.

या अंतिम सामन्याचे काही हायलाइट्स...

आदित्य सरवटे (स्रोत)

विदर्भाचा आदित्य सरवटे हा ऑलराउंडर खेळाडू आहे. त्याने आपल्या गोलंदाजीच्या जोरावर दुसऱ्या इनिंगमध्ये दिल्लीच्या ३ खेळाडूंना माघारी पाठवलं. गोलंदाजीशिवाय त्याने केलेले ७९ रन्स देखील महत्वाचे ठरले. आदित्यबरोबर अक्षय वखरेने सर्वाधिक अशा ४ विकेट्स पटकावल्या. रजनीश गुरबानी या गोलंदाजाने तर कामालाच केली राव. त्याने या अंतिम लढतीत हॅटट्रिक ठोकली आहे. रणजीच्या फायनल्समध्ये हॅटट्रिक करणारा तो दुसरा खेळाडू ठरला आहे.

फैज फजल (स्रोत)

अक्षय वाडकर या पठ्याने त्याचं शतक ठोकून टीमला ट्रॉफीच्या अगदी जवळ नेऊन पोहोचवलं. त्याच्या १३३ धावांच्या जोरावर विदर्भाच्या टीमने २५२ धावांची आघाडी घेऊन एक मोठं आव्हन दिल्लीसमोर ठेवलं. कर्णधार फैज फजल तसेच वसिम जफर, आदित्य सरवटे, सिद्धेश नेरळ यांनी फलंदाजीची भक्कम फळी तयार केली. या सर्वांच्या जोरावर विदर्भ विजेता ठरला आहे.

अक्षय वाडकर (स्रोत)

अंतिम सामना तसेच संपूर्ण सिरीजमध्ये जे चमकले, त्यात फैज फजल, आदित्य सरवटे, अक्षय वखरे, संजय रामास्वामी, रजनीश गुर्बानी आणि अक्षय वाडकर हे बहाद्दर होते.

एकंदरीत विदर्भाच्या टीमने टीम स्पिरीट दाखवत ट्रॉफीवर आपलं नाव कोरलंय. या संपूर्ण टीमचं बोभाटातर्फे हार्दिक अभिनंदन!!!