व्हीडिओ: फिफा अंडर १७ वर्ल्ड कपच्या ऑफिशियल गाण्यात झळकत आहेत सचिन, बायचंग भुतिया 

Subscribe to Bobhata

फुटबॉल वर्ल्ड कप एक धमाल मजा असते. भारताचा मुख्य संघ सध्या ऑल टाइम बेस्ट पदावर आहे. तसं टॉप ३२ मध्ये येणं फार दूर आहे. यावर्षी आपल्याला भारताचा अंडर १७ चा संघ वर्ल्ड कप खेळताना दिसणार आहे. त्याचं कारणही तसेच आहे, कारण हा वर्ल्ड कप भारतात होणार आहे. येत्या ६ ते २८ ऑक्टोबर दरम्यान  ही स्पर्धा होणार आहे. 

फुटबॉल वर्ल्ड कपची अजून एक खासियत असते ते म्हणजे त्याचं अधिकृत गाणं. हे गाणं म्हणजे यजमान देशाच्या संस्कृतीचा आणि फुटबॉल स्पिरिटचा एक मस्त असा संगम असतो. या गाण्यात भारताच्या संस्कृतीची झलक दिसतेच, पण त्याबरोबर भारताचा माझी कर्णधार बायचंग भुतिया, सचिन तेंडुलकर फिचर केलेलं आहे.

हे गाणं शान, पपॉन, मिका सिंग, सुनिधी चौहान, नीती मोहन यांनी गायलं आहे. या पैकी काहीजणांची झलक पण आपल्याला या गाण्यात दिसते. 

आजवरचा इतिहास पाहता फुटबॉल वर्ल्ड कपचं ऑफिशियल गाणं हे या स्पर्धेचे वातावरण तयार करते. ही  जरी युवा स्पर्धा असली तरी अजून भारतात या स्पर्धेची म्हणावी तशी वातावरण निर्मिती झालेली नाही.

सबस्क्राईब करा

* indicates required