computer

भारतीय संघाला विजयाची सवय लावणारे विजय हजारे !

महाराष्ट्राने देशाला अनेक महान क्रिकेटपटू दिले आहेत. सचिन तेंडुलकर, सुनील गावस्कर असे अनेक खेळाडू सांगता येतील. पण स्वातंत्र्यानंतर त्या वेळच्या कठीण परिस्थितीत भारतीय संघाला विजयाची सवय लावली ती एका विजय नावाच्या खेळाडूने. हा खेळाडू सांगलीच्या एका शिक्षकाच्या आठ मुलांपैकी एक होता.

ही गोष्ट आहे विजय हजारे यांची. विजय हजारे हे नाव तुम्ही विजय हजारे ट्रॉफीच्या निमित्ताने ऐकले असेल. पण ज्यांच्या नावाने ही स्पर्धा भरवली जाते ते कोण आहेत हे आज तुम्ही वाचणार आहात. स्वतंत्र भारतातील भारतीय संघाचा पहिला कॅप्टन आणि भारताला स्वातंत्र्य मिळाल्यावर विजय मिळवून देणारा पहिला कॅप्टन अशी त्यांची ओळख आहे.

विजय हजारे यांनी मिळवून देणारा विजय खास असण्याचे कारण म्हणजे जगाला क्रिकेट हा खेळ देणारा आणि भारतावर दीडशे वर्ष राज्य करणाऱ्या इंग्लंडला हरवण्याचा पराक्रम विजय हजारे यांच्या नेतृत्वाखाली भारताने केला होता. एक इनिंग आणि ८ दहावा इतक्या मोठ्या फरकाने भारताने हा सामना भारताने जिंकला होता.

विजय हजारे यांनी आंतरराष्ट्रीय सामन्यांव्यतिरिक्त प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पण जबरदस्त कामगिरी केली आहे. सचिन, गावस्कर, द्रविड आणि वसीम जाफरनंतर सर्वात जास्त धावा विजय हजारे यांच्या नावावर आहेत. रणजी ट्रॉफीत सर्वात आधी ट्रिपल शतक ठोकणारे ते पहिले होते.

बडोदा विरुद्ध झालेल्या सामन्यात त्यांनी ३१६ धावा केल्या होत्या. इथेच ते थांबले नाहीत तर त्यांनी अजून एक ट्रिपल शतक केले होते. त्यांच्या तुफान बॅटींगच्या अंदाज या गोष्टीवरून लावता येऊ शकतो की त्यांनी १९४८ साली ऑस्ट्रेलिया विरुद्ध त्यांच्याच भूमीत झालेल्या सामन्यात सलग दोन इनिंगमध्ये त्यांनी शतक काढले होते.

त्यांची त्याकाळची बॅटिंग बघून कुणालाही सेहवागसारख्या तडाखेबंद खेळाडूची आठवण येईल अशी बॅटिंग त्याकाळी ते कसोटी सामन्यांत करत होते. त्यांच्या नावावर असलेला अजून एक विक्रम म्हणजे सलग तीन सामन्यांमध्ये शतक करणे. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये ५० शतक करण्याचा विक्रम सुद्धा त्यांच्या नावावर आहे.

विजय हजारे यांच्या या भन्नाट कर्तृत्वाचा गौरव म्हणून त्यांच्या नावाने २००२-०३ साली एकदिवसीय स्पर्धा सुरू करण्यात आली. रणजी स्पर्धा संपल्यावर ही स्पर्धा सुरू होते. भारतीय क्रिकेटचा भूतकाळ हा पण तितकाच समृद्ध होता हेच यातून दिसून येते.

उदय पाटील

सबस्क्राईब करा

* indicates required