विराट कोहलीच्या IPL प्रवासाचे पेंटिंग २४ करोड मध्ये विकले गेले...वाचा कोणी घेतले!!!

विराट कोहलीचं एक चित्र नुकतंच तब्बल २४ करोड इतक्या भारी किमतीला विकलं गेलंय. चित्राची खास बात म्हणजे यात विराट कोहलीचा IPL मधला पूर्ण १० वर्षाचा प्रवास दाखवण्यात आलाय. हे चित्र काढलंय चित्रकार ‘साशा जेफ्री’ यांनी. विराट कोहलीचा पूर्ण प्रवासाचा लेखाजोखा या एका चित्रात आपण बघू शकतो.

Image result for Sasha Jaffrey virat kohli

विराट कोहली फाउंडेशननं आयोजित केलेल्या चॅरीटी डिनरनच्या वेळी भारतीय वंशाच्या व्यावसायिका पूनम गुप्ता यांनी हे पेंटिंग जवळ जवळ २४ करोड किमतीला विकत घेतलं.

भारतीय वंशाचे चित्रकार साशा जेफ्री हे अनेक पुरस्कारांनी सन्मानित पसिद्ध चित्रकार असून त्यांनी या आधी सचिन तेंडूलकर, महेंद्रसिंह धोनी, डेविड बॅकहॅम अश्या बड्या क्रिकेटर्सना त्यांच्या चॅरीटी कार्यक्रमात मदत केली आहे.

सबस्क्राईब करा

* indicates required