गळ्यात मेडल्स आणि जर्सी घालून भिक मागणारा या खेळाडूबद्दल आहे तरी कोण ??

नुकतेच जकार्ता मध्ये एशियन गेम्स पार पडले. भारतीय खेळाडूंनी अफलातून कामगिरी करत मेडल्स जिंकले. या आनंदाच्या वातावरणात एका बातमीने सगळ्यांनाच प्रचंड धक्का दिला आहे. मनमोहन सिंह लोधी हा राष्ट्रीय स्थरावर पदक मिळवलेला खेळाडू आज सिग्नल वर मेडल्स आणि जर्सी घालून भिक मागतोय. त्याने भारतासाठी अनेक पदक जिंकले आहेत पण सध्या त्याच्यावर ही परिस्थिती आली आहे.

त्याच्यावर ही वेळ का आली ? प्रत्येक भारतीयाने हे जाणून घेतलं पाहिजे.

मनमोहन सिंह लोधी मध्यप्रदेशच्या नरसिंगपूर मधला असून तो एक अपंग खेळाडू (पॅरा-अॅथलीट) आहे. २००९ साली एका अपघातात त्याला हात गमवावा लागला. त्यानंतरही तो शांत बसला नाही. २०१७ साली त्याने ‘स्पेशल ऑलेम्पिक भारत’ स्पर्धेत १०० मीटरच्या शर्यतीत रौप्य पदक पटकावलं. याशिवायही त्याने अनेक स्पर्धांमध्ये भाग घेऊन मेडल्स पटकावलेत.

स्रोत

मनमोहन सिंह लोधीने मध्यप्रदेशच्या मुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती. त्याला सांगण्यात आलं होतं की त्याला सरकारी नोकरी देण्यात येईल. पण अनेकदा खेपा मारूनही त्याला नोकरी मिळाली नाही. कुटुंबाचा एकमेव आधार असल्याने नोकरी मिळणं अत्यंत गरजेचं असल्याचं तो म्हणतो.

नोकरी नसल्याने शेवटी त्याने भिक मागण्याचा मार्ग निवडला. पण भिक मागताना त्याने आपले मेडल्स आणि जर्सी घालून भिक मागितली. तो सध्या बेघर लोकांसाठीच्या आश्रमात राहतो.

एक खेळाडू जर्सी आणि मेडल्स मध्ये भिक मागतोय हे प्रत्येक भारतीयासाठी लाजिरवाणी गोष्ट आहे.

सबस्क्राईब करा

* indicates required