सावधान, पृथ्वीची गती कमी होतेय!! याचे परिणाम काय होतील जाणून घ्या!

पृथ्वी सूर्याभोवती फिरते त्यानुसार दिवस उगवतो आणि रात्र होते. दिवसाची वेळ आणि रात्रीची वेळ ही ठरलेली असते हे सर्वसाधारणपणे आपल्याला माहित आहे. पण समजा जर पृथ्वीची गती कमी झाली, तर काय होईल ? दिवस मोठा होईल ना राव. आणि सध्या तेच होतंय. पृथ्वीची सूर्याभोवती फिरण्याची गती हळू हळू कमी होत आहे. याचं कारण काय ? की फक्त ही पोकळ माहिती आहे ? चला जाणून घेऊया.

स्रोत

मंडळी, वैज्ञानिकांना पृथ्वीची गती कमी होत असल्याबद्दल फार पूर्वीच समजलं होतं. पूर्वी याबद्दल जास्त माहिती उपलब्ध नव्हती पण आता नवीन तंत्रज्ञानामुळे याबद्दल सखोल माहिती मिळाली आहे.

तर त्याचं असं, शास्त्रज्ञांनी इतिहासात होऊन गेलेल्या ग्राहणांचा अभ्यास केला. ग्रहणाची वेळ आणि त्याची जागा व दिवसाचे एकूण तास मोजण्यात आले. त्यानुसार अशी माहिती मिळाली की पृथ्वीची गती फार पूर्वीपासून कमी-जास्त होत आलेली आहे. पण हे बदल एवढ्या सूक्ष्मपणे घडतात की याचा अंदाज आपल्याला येत नाही.

याचं कारण काय ?

स्रोत

तुम्हाला तर माहितीच असेल पृथ्वी अनेक थरांनी बनली आहे. त्यातलाच एक थर आहे ‘आउटर कोर’. हा थर लोह आणि निकेलने बनलेला आहे. या भागात होणाऱ्या हालचालीत अडथळा आला की पृथ्वीच्या गतीवर परिणाम होतो. याला सगळ्यात जास्त जबाबदार आहे आपल्या अनेकांचा लाडका ‘चंद्र’.

चंद्राच्या गुरुत्वाकर्षणाचा चांगलाच फटका पृथ्वीला बसतो. चंद्रामुळे भरती आहोटी येतात हे तर आपल्याला भूगोलाच्या पुस्तकात शिकवलेलं आहेच. पण त्याही पलीकडे जाऊन चंद्र हा पृथ्वीच्या गतीवर परिणाम करत असतो. पृथ्वीचा जो भाग चंद्राला सामोरा जातो त्या भागावर चंद्राच्या गुरुत्वाकर्षणाचा परिणाम जास्त होती. पृथ्वीचा हा भाग अतिसूक्ष्म स्तरावर खेचला जातो. याला “टायडल ब्लजेस” म्हणतात. चंद्राचा आकार आणि गती पृथ्वीपेक्षा खूप कमी (पृथ्वीवरचे ६५५.७२ तास म्हणजे चंद्रावरचा एक दिवस) असल्यामुळे त्याचा फार परिणाम होत नाही. चंद्राच्या गुरुत्वाकर्षणाने पृथ्वीवर जो दबाव निर्माण होतो त्यामुळे पृथ्वीची गती कमी होत आहे असं संशोधन सांगतं.

चंद्राला संपूर्णपणे दोष देणं चुकीचं आहे राव. कारण आपल्या सौर मंडळात असे अनेक घटक आहेत ज्यांचा पृथ्वीच्या कक्षेवर परिणाम होतो. शास्त्रज्ञ विविध साधनं आणि भौगोलिक विश्लेशणांच्या आधारे पृथ्वीची गती मागील शेकडो वर्षात किती कमी होत गेली आणि त्याचा भविष्यावर काय परिणाम होईल याचा शोध घेत आहेत.

खरं तर घाबरण्याचं कारण नाही. पृथ्वीची गती कमी होऊन फरक जाणवण्या इतके दिवसाचे तास वाढायला अजून फार वर्ष आहेत. तो पर्यंत आपल्या अनेक पिढ्या गेलेल्या असतील.

 

आणखी वाचा :

सूर्य अदृश्य झाला तर काय होईल भाऊ ?

जगातली सगळी माणसं अदृश्य झाली तर काय होईल ? पहा हा व्हिडीओ !!

काय असते हे लॅंड आर्ट - अर्थ आर्ट ?

शनिवार स्पेशल : पृथ्वीबद्दल या १० रंजक गोष्टी माहित आहेत का ?

सबस्क्राईब करा

* indicates required