युझी चहलच्या डोक्यावर सजणार रॉयल्सच्या कर्णधाराचा ताज? जाणून घ्या काय आहे प्रकरण

येत्या काही दिवसात आयपीएल २०२२ स्पर्धा (Ipl 2022) स्पर्धा सुरू होणार आहे. या स्पर्धेसाठी सर्व १० संघांनी कसून सरावाला सुरुवात केली आहे. ही स्पर्धा २६ मार्च पासून सुरू होणार आहे. दरम्यान ही स्पर्धा सुरू होण्यापूर्वी राजस्थान रॉयल्स फ्रँचायजीने एक मोठा निर्णय घेतला आहे. ज्याची सध्या सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे. (yuzvendra chahal) 

राजस्थान रॉयल्स संघाच्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवर युजवेंद्र चहलचा एक फोटो शेअर करण्यात आला आहे. ज्यावर त्यांनी आमचा नवीन कर्णधार असे लिहिले आहे. या ट्विट नंतर अनेकांना असे वाटू लागले आहे की, राजस्थान रॉयल्स संघाने संजू सॅमसनला कर्णधारपदावरून काढून युजवेंद्र चहलला कर्णधारपद दिले आहे. परंतु असे काहीच नाहीये. काय आहे नक्की प्रकरण चला जाणून घेऊया.(Yuzvendra chahal captain of rajasthan royals) 

भारतीय संघाचा फिरकी गोलंदाज युजवेंद्र चहल आगामी हंगामात राजस्थान रॉयल्स संघाकडून खेळताना दिसून येणार आहे. तो आपल्या मजेशीर स्वभावासाठी नेहमीच चर्चेत असतो. त्याने एक ट्विट केले होते, ज्यावर त्याने ' मी राजस्थान रॉयल्स संघाचे सोशल मीडिया अकाऊंट हॅक करेन..' असे लिहिले होते. या ट्विट नंतर राजस्थान रॉयल्स संघाने एक मिम शेअर केला होता आणि पासवर्ड देखील शेअर केला होता.(Yuzvendra chahal tweet) 

या ट्विटला प्रतिसाद देत युजवेंद्र चहलने धन्यवाद म्हटले आणि स्वतःच राजस्थान रॉयल्सच्या अकाऊंटवरून कर्णधार असल्याची पोस्ट केली. आगामी हंगामात देखील चहल नव्हे तर संजू सॅमसन संघाचे नेतृत्व करताना दिसून येणार आहे. ही स्पर्धा २६ मार्च पासून सुरू होणार आहे.

सबस्क्राईब करा

* indicates required