computer

थिएटर्स बंद आहेत म्हणून काय झालं? हे १० नवेकोरे सिनेमे घरच्याघरीच पाहा.

भारतात लॉकडाऊनची सुरुवात होण्यापूर्वीच नाट्यगृहं आणि सिनेमागृहं बंद करण्यात आली होती. आज या गोष्टीला जवळजवळ दोन महिने उलटून गेले आहेत. साहजिकच याचा फटका मनोरंजन विश्वाला बसत आहे. सिनेमांच्या प्रदर्शनाचं सगळं वेळापत्रक कोलमडलं आहे. अशावेळी ऑनलाईन स्ट्रिमिंग प्लॅटफॉर्म सिनेमासृष्टीच्या मदतीला धावून आले आहेत. थिएटर्स पुन्हा उघडण्याची वाट न बघता फिल्म्स ऑनलाईन स्ट्रिमिंग प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित करण्यात येत आहेत. बोभाटाच्या माध्यमातून अशा १० फिल्म्सची ओळख आज करून घेऊया.

१. शकुंतला देवी.

ह्युमन कॅल्क्युलेटर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शकुंतला देवी यांच्या आयुष्यावर आधारित चित्रपट येतोय. विद्या बालनने शकुंतला देवी याचं पात्रं साकारलं आहे. लवकरच अमेझॉन प्राईमवर चित्रपट प्रदर्शित होईल.

२. लक्ष्मी बॉम्ब

अक्षय कुमारचा लक्ष्मी बॉम्ब सिनेमातला साडी मधला अवतार चांगलाच चर्चेत आला होता. हा सिनेमा उद्या म्हणजे २० मे रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होणार होता, पण आता हा सिनेमा डिस्ने + हॉटस्टारवर प्रदर्शित होणार आहे.

३. झुंड

झुंडच्या निमित्ताने नागराज मंजुळे आणि अमिताभ बच्चन यांनी पहिल्यांदाच एकत्र काम केलेलं आहे. हा सिनेमा तयार होताना  बऱ्याच अडचणी आल्या. झुंड आधी २०१९ साली रिलीज होणार होता, मग प्रदर्शनाची तारीख ८ मे २०२० ठरवण्यात आली. असं म्हणतात की कोरोना संकटामुळे ही फिल्म नेटफ्लिक्सवर प्रदर्शित करण्यात येणार आहे.

४. लुडो

बर्फी, जग्गा जासूस दिग्दर्शित करणारे अनुराग बासू यांनी 'लुडो' दिग्दर्शित केला आहे.  सिनेमात राजकुमार राव, अभिषेक बच्चन, सान्या मल्होत्रा, फातिमा सना शेख, पंकज त्रिपाठी आणि रोहित सुरेश सराफ अशी मोठी स्टारकास्ट आहे. लवकरच नेटफ्लिक्सवर सिनेमा प्रदर्शित होईल.

५. गुंजन सक्सेना : कारगिल गर्ल

युद्धात उतरणाऱ्या पहिल्या भारतीय महिला गुंजन सक्सेना यांच्या आयुष्यावर आधारित 'गुंजन सक्सेना : कारगिल गर्ल' हा सिनेमा लवकरच नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे. या सिनेमात जान्हवी कपूरने गुंजन सक्सेना यांची भूमिका साकारली आहे.

६. गुलाबो सिताबो

अमिताभ बच्चन आणि आयुष्मान खुराणा यांनी गुलाबो सिताबोमध्ये पहिल्यांदाच एकत्र काम केलं आहे. विकी डोनर नंतर दिग्दर्शक सुजित सरकार यांच्या सोबतचा आयुषमान खुराणाचा हा दुसरा चित्रपट असणार आहे.  १२ जून २०२० रोजी अमेझॉन प्राईमवर सिनेमा प्रदर्शित होईल.

७. खाली पिली

खाली पिली हा romantic action प्रकारतला सिनेमा असणार आहे. इशान खट्टर आणि अनन्या पांडे हे पहिल्यांदाच एकत्र काम करत आहेत. हा चित्रपट नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होईल.

८. इंदू की जवानी

ही गाझियाबाद येथील मुलीची कथा आहे.  डेटिंग अॅप्समुळे तिच्या आयुष्यात काय घडतं हे या चित्रपटात मांडण्यात आलं आहे. इंदूच्या भूमिकेत कियारा अडवाणी असणार आहे. हा चित्रपट ५ जून रोजी प्रदर्शित होणार होता, पण आता तो डिजिटल प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होईल.

९. शिद्दत

राधिका मदन आणि विकी कौशलचा भाऊ सनी कौशल यांचा शिद्दत हा सिनेमा देखील डिजिटल प्लॅटफॉर्मवर पदार्षित होईल. प्रदर्शनाची तारीख आणि कोणत्या डिजिटल प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे याबद्दल लवकरच माहिती मिळेल.

१०. मिमी 

मिमी सिनेमा २०११ आली आलेल्या 'मला आई व्हायचंय' या मराठी चित्रपटाचा रिमेक असणार आहे. या चित्रपटात कृती सॅनॉन, पंकज त्रिपाठी आणि सई ताम्हणकर हे मुख्य भूमिकेत असतील. हा चित्रपट डिस्ने + हॉटस्टारवर प्रदर्शित होईल.

सबस्क्राईब करा

* indicates required