computer

मुंबईत दिसतंय चक्कं गुलाबी तळं!! नेमकं काय आहे यामागचं रहस्य?

मंडळी, मुंबईतल्या पामबीच मार्गाला लागून असलेली एनआरआय कॉम्प्लेक्स जवळचे तलाव आणि पाणथळ जागा तशी दरवर्षी इथे येणाऱ्या विविध देशी-विदेशी स्थलांतरित पक्ष्यांंमुळे आणि इथे आढळणाऱ्या जैवविविधतेमुळे प्रसिद्ध आहेत. इथं मानवी हस्तक्षेप कमी आहे. त्यामुळे गुजरातमधून इथे स्थलांतरित झालेले हजारो‌ फ्लेमिंगो पक्षी इथं येऊन वास्तव्य करतात. त्यामुळे ही जागा गुलाबी रंगाने‌ रंगून जाते. पण सद्या इथल्या तळ्यातल्या पाण्याचा रंगही अचानक गुलाबी झालाय! 'हिंदुस्तान टाइम्सचे' पत्रकार प्रतिक चोरगे यांनी या गुलाबी पाणथळीचे फोटो टिपलेत.

'बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी'च्या मते मुंबई परिसरात अशा प्रकारचं दुर्मिळ दृश्य पहिल्यांदाच दिसत आहे. त्यामुळे त्यांनी या गुलाबी पाण्याचे नमुने तपासणीसाठी घ्यायचं ठरवलंय. पण इथल्या एका स्थानिक महिलेने मात्र या खाडीत ‌अशाच प्रकारचं गुलाबी पाणी २०१६ मध्येही आपण पाहिलं असल्याचं सांगितलं. हे गुलाबी पाणी एखादं रसायन मिसळल्यासारखं वाटत होतं. 

या गुलाबी पाण्यामागचं नेमकं कारण अजूनही संशोधकांना माहित ‌नसलं तरी त्यांच्या मते‌ या पाण्याला‌ हा गुलाबी रंग‌ उष्ण हवामानात‌ खारट पाण्यात ‌वाढणाऱ्या लाल रंगाच्या सुक्ष्म शैवाल ‌आणि बुरशीमुळे मिळाला आहे. ही बुरशी दमट वातावरणात पाण्यात रंगद्रव्य निर्माण करते आणि ते या पक्षांना आकर्षित ‌करते. "जगात अनेक ठिकाणी याआधी लाल शैवालांमुळे असा प्रकार दिसला असला तरी मुंबईत हे दृश्य ‌पहिल्यांदाच दिसतंय. फ्लेमिंगो हे झोपलॅनकेटॉन नावाचे पाण्यातील जिवाणू खातात, जे या लाल रंगाच्या बुरशीवर जगतात. त्यामुळे त्यांना लाल आणि गुलाबी रंग‌ प्राप्त होतो." असं BNHS चे संचालक दिपक आपटे सांगतात.

याचा संबंध बाष्पीभवन आणि सध्याच्या उष्ण-दमट हवामानाशी असल्याचंही तज्ञ सांगतात. मात्र याचा पक्ष्यांवर काय परिणाम दिसून येतो हे मात्र कळलेलं नाही. याआधी असं पाणी ओडिशाच्या चिल्का सरोवर आणि तामिळनाडूच्या थुथूकोडी इथेही पाहिलं‌‌ गेलंय.

याचा संबंध बाष्पीभवन आणि सध्याच्या उष्ण-दमट हवामानाशी असल्याचंही तज्ञ सांगतात. मात्र याचा पक्ष्यांवर काय परिणाम दिसून येतो हे मात्र कळलेलं नाही. याआधी असं पाणी ओडिशाच्या चिल्का सरोवर आणि तामिळनाडूच्या थुथूकोडी इथेही पाहिलं‌‌ गेलंय.

 

आणखी वाचा :

शेजारी निळाशार समुद्र असूनही हा तलाव गुलाबी कसा ?? फोटोशॉप तर नक्कीच नाहीय हा !!

सबस्क्राईब करा

* indicates required