computer

स्मार्टफोन घेताय? मग कोणकोणत्या स्मार्टफोन्सची किंमत उतरलीय ते पाहून घ्या...

गेल्या एप्रिलमध्ये केंद्र सरकारनं स्मार्टफोन्सवरचा जीएसटी १२% वरून १८% पर्यंत वाढवला. त्यामुळं सगळयाच स्मार्टफोन्सच्या किंमतीत थोडी वाढ झाली. त्यात लॉकडाऊनमुळे स्मार्टफोन विक्रीही पूर्णपणे ठप्प झाली. पण आता लॉकडाऊनचे नियम शिथील झाल्यामुळे तुम्ही आता स्मार्टफोन खरेदी करू शकता मंडळी.

लॉकडाऊनमुळं झालेलं नुकसान भरून काढण्यासाठी आणि आपल्या स्मार्टफोन विक्रीला परत गती देण्यासाठी स्मार्टफोन कंपन्यांनी आपल्या अनेक स्मार्टफोन मॉडेल्सच्या किंमती बऱ्याच कमी केल्या आहेत. चला पाहूया त्यातील‌‌ काही निवडक स्मार्टफोन्स...

OnePlus 7T Pro

वनप्लसच्या या लोकप्रिय प्रिमियम स्मार्टफोनच्या 8 जीबी रॅम आणि 256 जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत ६००० रूपयांनी कमी झालीय. आता तुम्ही तोॲमेझॉन किंवा वनप्लसच्या वेबसाईटवरून ४७,९९९ रूपयांत खरेदी करू‌‌ शकता. या स्मार्टफोनमध्ये शक्तीशाली स्नॅपड्रॅगन‌ 855+ चिपसेट, आणि ६.६७ इंचाचा QHD+ AMOLED डिस्प्ले 90Hz च्या रिफ्रेश रेट सोबत दिला गेलाय. यात 4085mAh ची दमदार बॅटरी आहे जी 30W फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीसोबत येते.

IQOO 3

Vivo ची‌ सबब्रॅन्ड असणाऱ्या IQOO ने वनप्लसला टक्कर देण्यासाठी भारतात पहिल्यांदाच आपला IQOO 3 हा स्मार्टफोन फेब्रुवारीत लॉन्च केला होता.  IQOO 3 च्या 8 जीबी रॅम -‌ 128 जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत ४००० रूपयांनी कमी होऊन ३४,९९० रूपये झालीय. हीच किंमत पूर्वी ३८,९९० रूपये होती. 

8 जीबी रॅम - 256 जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमतसुध्दा ४००० रूपयांनी उतरून ३७,९९० झालीय. या मोबाईलची किंमत याआधी ४१,९९० रूपये होती. 

IQOO 3 मध्ये स्नॅपड्रॅगनचा नवीन 865 चिपसेट दिला गेलाय. हा चिपसेट 5G सपोर्ट करतो. यामध्ये आपल्याला 6.44 इंचाचा FHD+ AMOLED डिस्प्ले HDR10+ सपोर्टसोबत मिळतो. तसंच यात 55W च्या फास्ट चार्जिंग सपोर्टसह 4400mAh ची बॅटरी आणि InDesplay Fingerprint Scanner ही मिळतो.

Samsung Galaxy A50s

सॅमसंगच्या या मध्यम-बजेट रेंज स्मार्टफोनच्या 4 जीबी रॅम व्हेरीएंटची किंमत २१,०७० रूपयांवरून १८,५९९ रूपये झालीय, तर 6 जीबी रॅम व्हेरीएंटची किंमत २६,९०० रुपयांवरून २०,५६१ रूपये झाली आहे.

48 मेगापिक्सल, 8 मेगापिक्सल आणि 5 मेगापिक्सल, अशा ट्रिपल‌ रिअर कॅमेरा सेटअप सोबत 32 मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा, Exynos 9611 प्रोसेसर, 6.4 इंचाचा FHD+ Super AMOLED डिस्प्ले, 4000mAh बॅटरी या स्मार्टफोनमध्ये मिळते.

Vivo S1

Vivo S1 च्या 4 जीबी रॅम -‌ 128 जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत घसरून १७,९९० रूपयांवरून वरून १६,९९० रूपयांवर आलीय. याचं 6 जीबी रॅम - 64 जीबी स्टोरेज व्हेरिएंट १७,९९० रूपयांत तर 6 जीबी रॅम -‌ 128 जीबी स्टोरेज व्हेरिएंट १९,९९० रूपयांत उपलब्ध आहे.

यामध्ये आपल्याला 6.38 इंचाचा FHD डिस्प्ले, मिडीयाटेकचा P65 प्रोसेसर, 16+8+5 मेगापिक्सल्सचा ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप आणि 4500mAh ची बॅटरी मिळते.

Samsung Galaxy M21

बजेट रेंजमधल्या या स्मार्टफोनच्या 4 जीबी रॅम व्हेरीएंटची किंमत १४,२२२ रूपयांवरून १३,१९९ रूपयांपर्यंत कमी झाली आहे, तर 6 जीबी रॅम व्हेरीएंटची किंमत १६,४९९ रूपयांवरून १५,४९९ रूपयांपर्यंत कमी झाली आहे.
यामध्ये 6.4 इंचाचा FHD+ Super AMOLED डिस्प्ले, Exynos 9611 प्रोसेसर, गोरिल्ला ग्लास 3 चं प्रोटेक्शन, 6000mAh ची मोठी बॅटरी, 48 मेगापिक्सलचा ट्रिपल रिअर कॅमेरा, आणि 20 मेगापिक्सल्सचा फ्रंट कॅमेरा दिला गेलाय.

मग, आता तर काय कुरियर सर्व्हिसेस वगैरेंवरचा लॉकडाऊन उठला आहे. नवीन फोन नाही म्हणून गेले दोन महिने शांत बसावं लागत होतं. आता वाट कसली पाहाताय, उचला जुना फोन आणि नव्या फोनची ऑर्डर द्या.