computer

'गुडलक'साठी नावाची स्पेलिंग बदललेले बॉलीवूडचे १५ सेलिब्रिटीज !!

पूर्वी नाव बदलून नावाच्या शेवटी कुमार लावण्याची एक लाट आली होती. ‘दिलीप कुमार’, ‘राजेंद्र कुमार’, ‘मनोज कुमार’, ‘अशोक कुमार’, ‘किशोर कुमार’ आणि बॉलीवूडचा कदाचित शेवटचा कुमार ‘अक्षय कुमार’. अशी काही प्रमुख नावे घेता येतील. सध्या हा ट्रेंड इतिहासजमा झाला असून एक नवीन ट्रेंड प्रसिद्ध होतोय. हा ट्रेंड म्हणजे नावाच्या स्पेलिंग मध्ये बदल करणे. आता उदाहरणच घ्या ना, अजय देवगणने काही वर्षापूर्वीच आपल्या नावाचं स्पेलिंग  Ajay Devgan वरून Ajay Devgn असं बदललं. आपल्या मराठमोळ्या रितेश देशमुखने पण Ritesh Deshmukh चं Riteish Deshmukh करून घेतलं.

मंडळी, बॉलीवूड मध्ये संख्याशास्त्रावरचा विश्वास वाढताना दिसतोय. वेगवेगळे संख्याशास्त्रज्ञ बॉलीवूड मध्ये यश मिळवून देण्यासाठी स्पेलिंग मध्ये बदल करण्याचे सुचवतात. आज आम्ही अशी १५ उदाहरणं घेऊन आलो आहोत. यातील काही स्टार्सना याचा फायदा झाला आहे तर काहीचं करियर कामायचं बसलंय.

चला तर बघूया ते कोणकोणते बडे स्टार्स आहेत ज्यांनी ‘सक्सेससाठी’ आपल्या नावाची स्पेलिंग बदलली.  

१. सोनम कपूर

पूर्वी :  Sonam A. Kapoor 

आता : Sonam Kapoor

बॉलीवूड मध्ये येण्याआधी सोनम कपूर आपलं नाव Sonam A. Kapoor  लावायची. फिल्म इंडस्ट्रीत आल्यानंतर तिने आपल्या वडिलांच्या नावाचा A काढून टाकला.

२. करिश्मा कपूर

आता : Karishma Kapoor

पूर्वी : Karisma Kapoor

करिश्माची करिझ्मा झाली पण फरसा ‘करिश्मा’ झाला नाही ना राव.

३. आयुष्मान खुराना

पूर्वी : Ayushman Khurana 

आता : Ayushmann Khurrana

आयुष्मान खुराना सध्या त्याच्या करियरच्या टॉपला आहे. याचं श्रेय नावातील बदलला द्यायचं का ?

४. रितेश देशमुख

पूर्वी : Ritesh Deshmukh

आता : Riteish Deshmukh

असं म्हणतात, रितेशने मित्राच्या सल्ल्यावरून आपल्या नावात I जोडला आहे.

५. करीना कपूर

पूर्वी : Kareina Kapoor 

आता : Kareena Kapoor

करीना कपूरने Kareena नावातल्या E ला डच्चू देऊन I ला आणलं होतं. पण तिच्या वडिलांना हे आवडलं नाही. मग तिने पुन्हा पूर्वीचच नाव पुढे कायम ठेवलं.

६. राणी मुखर्जी

पूर्वी : Rani Mukherji

आता : Rani Mukerji

हे जरा ब्रिटीश नाव नाही का वाटत राव ? आणि एकंदरीत तिचं करियर सुद्धा चालत नाहीये.

७. राजकुमार राव

पूर्वी :   Rajkumar Yadav 

आता : Rajkummar Rao

राजकुमार रावच्या बाबतीत त्याच्या करियरचे खरोखर ‘अच्छे दिन’ आलेत असं म्हणू शकतो.

८. जावेद जाफ़री

पूर्वी :  Javed Jaffrey 

आता : Jaaved Jaafery

हे या लिस्ट मधलं सर्वात कठीण नाव असावं. उच्चार कसा करायचा राव ?

९. टीना आहूजा

पूर्वी :  Narmada Ahuja

आता : Tina Ahuja

आता बरेचजण टीना अहुजा म्हणजे कोण असा प्रश्न विचारतील. अहो टीना अहुजा म्हणजे आपल्या गोविंदाची पोरगी. तिने नर्मदाचं ‘टीना’ केलं पण काहीच उपयोग झाला नाही.

१०. जिमी शेरगिल

पूर्वी :  Jimmy Shergill 

आता : Jimmy Sheirgill

मोहब्बते मधून आलेला हा गब्रू बॉलीवूड मध्ये फारसा चमकला नाही, पण त्याने खरी कमाल केली साईड रोल्स मध्ये. वर्षाला त्याचा एखाद तरी सिनेमा असतोच. अभिनयाच्या जोरावर त्याने मिळेल त्या रोलचं सोनं केलंय.

११. सुनील शेट्टी

पूर्वी :  Sunil Shetty 

आता : Suniel Shetty

बॉलीवूडचा अण्णा हिरो म्हणून फारसा कमाल करू शकला नाही, पण एक उद्योगपती म्हणून तो हिरोच आहे.

१२. विवेक ओबेरॉय

पूर्वी :  Vivek Oberoi 

आता : Viveik Oberoi

विवेकने सुरुवातीला Vivek चं 'Viveik' केलं मग काही वर्षांनी विवेकच्या पुढे 'आनंद' जोडलं पण त्याचाही काही परिणाम झाला नाही, म्हणून त्याने पूर्वीचं Viveik नाव कायम ठेवलं. सध्या त्याचं करियर डबघाईला आलंय भाऊ.

१३. तुषार कपूर

पूर्वी :  Tushar Kapoor 

आता : Tusshar Kapoor

तुषारने नावात एक एक्स्ट्रा S लावला पण हा S सुद्धा त्याचं करियर सावरू शकला नाही.

१४. हृतिक रोशन

पूर्वी :  Rithik Roshan 

आता : Hrithik Roshan

ह्रितिकचं करियर अधांतरीच चालू आहे. कदाचित त्याच्या आगामी ‘सुपर ३०’ ने काहीतरी कमाल होईल.

१५. अजय देवगण

पूर्वी : Ajay Devgan

आता : Ajay  Devgn

अजय देवगणला ‘दिलवाले’ मधल्या देवदास पासून सिंघम मधला ‘बाजीराव’ मध्ये रुपांतरीत करण्याचं काम याच स्पेलिंगने केलं असं म्हणतात.

 

 

मंडळी, नावातले हे बदल खरोखर काम करतात का हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. पण एक मात्र खरं ‘मेहनतीला पर्याय नाही.’

सबस्क्राईब करा

* indicates required