'आणि...काशिनाथ घाणेकर'चा 'कडक' टीझर आलाय भाऊ....प्रत्येक मराठी माणसाने बघितलाच पाहिजे !!

रंगभूमीचा पहिला सुपरस्टार काशिनाथ घाणेकर यांच्या आयुष्यावर आधारित चित्रपटाचा टीझर रिलीज झालाय. सुबोध भावेचं हे तिसरं बायोपिक. पण नेहमीच (वाईट चित्रपट असला तरी) त्याचं काम असलं ‘कडक’ असतंय की नाव ठेवायला जागाच उरत नाही राव. अशाच अफलातून कामाची झलक या टीझर मधून मिळते.

टीझर मध्ये चित्रपटातील सर्वच प्रमुख भूमिका एकामागेमाग एक दाखवल्या आहेत. प्रभाकर पणशीकर, श्रीराम लागू, मास्टर दत्ताराम, वसंत कानेटकर, भालजी पेंढारकर, सुलोचना दीदी. एकेकाळची रंगभूमी गाजवणारी फळी आणि त्यांच्या भूमिका साकारणारी आजच्या कलाकारांची फळी बघून उत्सुकता वाढली आहे.

टीझर मधून सर्वच बडे कलाकार काशिनाथ घाणेकर यांच्या विरोधात होते असं दिसतंय. यात किती तथ्य आहे ? हे तर आपल्याला चित्रपटातच पाहायला मिळेल. या टीझरचं मुख्य आकर्षण शेवटच्या २३ सेकंदात अवतरतं. त्यासाठी हा टीझर बघून घ्या....

चला तर सुबोधचा हा नवा बायोपिक तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला नक्की सांगा !!

सबस्क्राईब करा

* indicates required