दिनविशेष : देशाला पहिला ऑस्कर मिळवून देणारी महिला मा.भानू अथय्या यांचा आज वाढदिवस !!

जन्म- २८ एप्रिल १९२९ कोल्हापुर येथे. मूळच्या महाराष्ट्रीय व मराठी असलेल्या भानुमती अण्णासाहेब राजोपाध्ये आणि सध्या भानू अथय्या या नावाने ओळखल्या जाणार्यार प्रसिद्ध महिला वेशभूषाकार. कोल्हापूर येथे जन्मलेल्या लहानपणापासूनच रेखाचित्र काढण्याची प्रचंड आवड होती. त्या मुळे त्यांनी मुंबई येथील जे. जे. स्कूल ऑफ़ आर्ट्स मध्ये प्रवेश घेतला व गोल्ड मेडल घेऊन पदवी प्राप्त केली. हिन्दी चित्रपटाचे गीतकार व कवि सत्येन्द्र अथय्या यांच्या बरोबर लग्न झाले व त्या भानुमती राजोपाध्येच्या मा.भानू अथय्या झाल्या. त्यांना लहानपणापासूनच गांधीजींचे रेखाचित्र काढण्याची प्रचंड आवड होती. त्यामुळेच त्यांना रिचर्ड अॅडटनबरो यांच्या 'गांधी' (१९८२) या आंतरराष्ट्रीय चित्रपटासाठी कॉश्चूम डिझाईन करण्याची संधी मिळाली. याच चित्रपटासाठी त्यांना १९८२ चा ऑस्कर पुरस्कार देण्यात आला. हा भारताचा पहिला ऑस्कर पुरस्कार होता.

स्रोत

देशाला पहिला ऑस्कर मिळवून देणाऱ्या भानू अथय्या यांचा ऑस्कर प्रवास थक्क करणारा आहे. मा.भानू अथय्या या १९५१ पासून भारतीय चित्रपटसृष्टीत सक्रिय आहेत. त्यांनी कामिनी कौशल या अभिनेत्रीसाठी पहिला कॉश्चूम डिझाइन केला होता. 'श्री ४२०' मधील अभिनेत्री नादिरा यांच्या साठी "मुड़-मुड़ के ना देख..." या गाण्यासाठी केलेला गाऊन ने नवीन ओळख दिली. अभिनेत्रा साधना यांच्या सलवार-कमीजचे डिजाईन हे भानु अथय्या यांचे असायचे.ज्याची जादू ७० च्या दशकात फॅशन म्हणून ओळखली गेली.

स्रोत

मा.भानु अथय्या या अश्या ड्रेस डिजाइनर आहेत की, ज्याचे कपडे त्या पात्रात च्या भूमिकेत जातात. मा.भानु अथय्या यांनी १३० हून अधिक चित्रपटात गुरुदत्त, यश चोपड़ा, राज कपूर, आशुतोष गोवारिकर, कॉनरेड रूक्स और रिचर्ड एटेनबरो यांच्याबरोबर काम केले आहे. 'सी.आई.डी.' , 'प्यासा' , 'चौदहवी का चाँद', और 'साहब बीबी और ग़ुलाम' ,'रेशमा और शेरा' या चित्रपटानी मा.भानु अथय्या यांना एक नवीन ओळख मिळाली.

स्रोत

मा.भानु अथय्या यांनी 'गाइड' मध्ये वहीदा रहमान, 'ब्रह्मचारी' मध्ये मुमताज', सत्यम् शिवम् सुंदरम्' या चित्रपटातील झीनत अमान हिचाही कॉश्चूम भानू यांनीच डिझाइन केला होता. गुलज़ार यांच्या 'लेकिन' या चित्रपटासाठी भानू अथय्या सर्वोच्च ड्रेस डिजाइनर अवार्ड मिळाले होते. भानु अथय्या यांनी 'डॉ. बाबासाहेब आंबेडकर' या चित्रपटासाठी पण ड्रेस डिजाइन केले आहे. मा.भानु अथय्या यांनी’ सीरियल्स व नाटकासाठी पण ड्रेस डिजाइन केले आहे. भानु अथय्या यांनी आपल्या जीवनावर 'द आर्ट ऑफ़ कॉस्ट्यूम डिज़ाइन' या नावाने एक पुस्तक पण लिहिले आहे. आपल्या समुहा तर्फे मा.भानू अथय्या यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा.

लेखक : संजीव वेलणकर, पुणे.