computer

हे २८ रोल्स कुणी केले होते हे तुमच्या नक्कीच लक्षात आलं नसेल...

काही दिवसांपूर्वीच आम्ही पडद्यामागे काम केलेल्या प्रसिद्ध सेलिब्रिटीजची माहिती दिली होती. आज आम्ही त्या सेलेब्रिटीज बद्दल सांगणार आहोत ज्यांनी पडदा गाजवण्यापूर्वी पडद्यावर अगदी क्षुल्लक भूमिका केल्या. तुम्हाला करण जोहरचा दिलवाले मधला रोल आठवतोय का? नवाजचा मुन्नाभाई एमबीबीएस आणि सरफरोशमधला रोल ? हे तर खूपच ओळखीचे रोल्स झाले राव. लगे राहो मुन्नभाई मध्ये अनुष्का शर्मा होती हे माहित आहे का? ब्लॅक फ्रायडे मध्ये तर दिग्दर्शक इम्तियाज अलीने महत्वाची भूमिका केली होती. हे तर काहीच नाही.. पहला नशा चित्रपटात तर शाहरुख, आमीर आणि सैफ अली खान एकत्र आले होते.

राव, अशा अनेक कलाकारांनी लहानसहान रोल्स केले आहेत. त्याकाळी हे सिनेमे बघताना मागे गर्दीत नाचणारा/नाचणारी किंवा २ संवाद बोलून निघून जाणारी व्यक्ती एकेदिवशी मोठी स्टार होईल असं वाटलंही नसतं.

राव, अशा कलाकारांची मोठी यादी आहे... चला तर सगळ्यांची ओळख करून घेऊया !!

१. झोया अख्तर - कामसूत्र

झोया अख्तर ही आजची आघाडीची दिग्दर्शिका आहे. पण तिने दिग्दर्शक म्हणून फिल्म्स इंडस्ट्रीत येण्यापूर्वी 'मीरा नायर' यांच्या 'कामसूत्र' चित्रपटात काम केलं होतं. ती 'रेखा' साकारत असलेल्या पात्राच्या म्हणजेच रसादेवीच्या २५ शिष्यांपैकी एक होती.

२. यश चोप्रा आणि पामेला चोप्रा - दिल तो पागल है

'दिल तो पागल है' हा चित्रपट यशराज यांनी दिग्दर्शित केला होता. 'एक दुजे के वास्ते' या गाण्यात ते स्वतः पत्नीसोबत दिसले होते. पण फार कमी लोकांनी त्यांना ओळखलं. यश जोहर आधीही आणि या गाण्याच्या वेळेसही खूप प्रसिद्ध होते. पण त्यांनी केलेला हा छोटासा रोल बरेचजणांच्या लक्षात आला नव्हता.

३. निखील अडवाणी आणि फराह खान - कूच कूच होता है

'कुछ  कुछ  होता है' मधला 'नीलम्स शो' आठवला का  त्यात मागच्या मुलामुलींमध्ये फराह खान आणि निखील अडवाणी हे दिग्दर्शक सुद्धा होते राव.

४. शाहीद कपूर

शहीद कपूरने ताल चित्रपटात काम केलं होतं ही माहिती काही वर्षांपूर्वीच फुटली होती. पण त्याने दिल तो पागल है मधल्या एका गाण्यात सुद्धा बॅॅकग्राउंड डान्सर म्हणून काम केलं होतं हे खूप कमीजणांना माहित आहे. शाहिद शामक दावरच्या डान्स ग्रुपमध्ये नाचत असे. त्यामुळेच तो या दोन्ही सिनेमांत दिसला होता.

५. अनुष्का शर्मा

अनुष्का शर्मा त्यावेळी मॉडेल म्हणून काम करायची. तिचा पोस्टर 'लगे राहो मुन्नाभाई'च्या एका सीन मध्ये दिसला होता. राव गंमत म्हणजे पोस्टर मध्ये दिसणारी मुलगी कोण हे दिग्दर्शक राजकुमार हिरानी यांनाही त्याकाळी माहित नव्हतं.

६. दिया मिर्झा - एन स्वासा कात्रे

दिया मिर्झाने 'रेहना है तेरे दिल में' पासून करियरला सुरुवात करण्याआधी तमिळ चित्रपटात बॅॅकग्राउंड डान्सर म्हणून काम केलं होतं. ती या सिनेमातल्या झुंबालिका गाण्यात दिसली होती. हे गाणं नंतर तक्षक सिनेमात डब करुन घेतलं गेलं होतं.

७. अनिता श्रॉफ अडजानिया, उदय चोप्रा आणि करण जोहर - दिल वाले दुल्हनिया ले जायेंगे

स्रोत

जसं करण जोहरने शाहरुखच्या मित्राची भूमिका साकारली होती, तशीच अनिता श्रॉफ अडजानिया या आजच्या आघाडीच्या फॅॅशन स्टायलिस्टनी काजोलच्या मैत्रिणीची भूमिका साकारली होती. यात उदय चोप्रा कुठे होता असा प्रश्न पडला असेल ना? चित्रपटात एका सीनमध्ये काजोलच्या समोरून सायकलवरून एक माणूस निघून जातो. तो दुसरा तिसरा कोणी नसून उदय चोप्रा होता राव.

८. जतीन-ललित - जो जिता वही सिकंदर

जतीन ललित जोडगोळीने ९० च्या दशकात अफलातून गाणी दिली. 'जो जिता वही सिकंदर' चित्रपटातल्या एका गाण्यात त्यांनी काम सुद्धा केलं होतं. 

९. अर्जुन कपूर - नीरजा

हा रोल फारच अनोखा होता राव. नीरजा सिनेमात एका सीनमध्ये नीरजाची आई जो फोटो अल्बम बघत आहे, त्यात अर्जुन कपूरच्या लहानपणीचा फोटो होता. 

१०. इम्तियाज अली - ब्लॅक फ्रायडे

ब्लॅक फ्रायडे या बहुचर्चित सिनेमात याकुब मेमनच्या भूमिकेत चक्क इम्तियाज अली दिसला होता. हा रोल लहान नव्हता राव. पण इम्तियाज अली त्याकाळात प्रसिद्ध नसल्याने त्याला कोणी ओळखलंच नाही.

११. गीता कपूर - कूच कूच होता है

'तुझे याद ना मेरी आयी' हे गाणं आठवलं का? त्या गाण्यात एका सीनमध्ये बंजारनच्या भूमिकेत भर पावसात बसून गाणारी बाई म्हणजे कोरिओग्राफर गीता (माँ) कपूर होती. 

१२. नवाजुद्दिन सिद्दिकी - ब्लॅक फ्रायडे, मुन्नाभाई एमबीबीएस, सरफरोश, जंगल, शूल, देव-डी

नवजुद्दिनने तर असे अनेक लहानमोठे रोल्स केले होते. ब्लॅक फ्रायडे, मुन्नाभाई एमबीबीएस, सरफरोश, जंगल, शूल, देव-डी मधल्या एका गाण्यातला सिंगर अशा रोल्समध्ये तो दिसला होता. 

नवाझुद्दिननं प्रसिद्ध होण्यापूर्वी इतक्या सिनेमांत काम केलंय की त्याची यादी मोठी आहे. त्यातल्या त्याच्या काही रोल्सबद्दल इथं वाचा..

१३. शाहरुख, सैफ, आमीर - पेहला नशा

शाहरुख आणि आमीर एका चित्रपटात कधीच आले नाहीत हे साफ खोटं आहे. शाहरुख, सैफ, आमीर हे तिघेही पहला नशा मधल्या एका सीनमध्ये दिसले होते. 

१४. किरण राव - दिल चाहता है

दिल चाहता है मधला गोव्याच्या हॉटेलचा सीन आठवतोय का ? त्या सीनमध्ये किरण रावसुद्धा होती. 

१५. जॉन अब्राहम - छुपके छुपके, सखियोंसे वो बातें (गाण्याचा व्हिडीओ)

९०च्या दशकात पॉप गाणी आणि नॉन फिल्मी अल्बम्स फार प्रसिद्ध होते. अजूनही लोक त्यांच्या आठवणीनं हळहळतात. त्याच सुमारास पंकज उधासच्या 'छुपके छुपके, सखियोंसे वो बातें करना भूल गयीं' या गाण्यात जॉन अब्राहम होता. पूर्ण गाणंभर तो हेल्मेट घालतो आणि सगळ्यात शेवटी त्याचा चेहरा आपल्याला दिसतो. 

१६. आयेशा टाकिया - मेरी चुनर उड उड जाये (गाण्याचा व्हिडीओ)

फाल्गुनी पाठकको कौन नहीं जानता?? तिच्याच 'मेरी चुनर उड उड जाये' गाण्यात आपली आयेशा टाकिया होती. हा तिचा खूपच लहान म्हणजे अगदी किशोरावस्थेतला व्हिडिओ असावा. आता सर्जरी करुन बिघडण्याआधी ती खूपच छान दिसत होती, नाही??

१७. शाहीद कपूर आणि आयेशा टाकिया - कॉम्प्लॅनची जाहिरात

 कॉम्प्लॅनच्या या जाहिरातीत आपले छोटे शाहिद कपूर आणि आयेशा टाकिया होते, हे माहित आहे का??

 

 

यांतले काही सीन ते लोक आधीच प्रसिद्ध असताना केले गेले, पण बरेचसे सीन या कलाकारांच्या संघर्षाची आपल्याला जाणीव करुन देतात. अशा छोट्या रोलनंतर कधीतरी एकदा मोठा ब्रेक मिळतो आणि मग कित्येक वर्षांनी या लोकांचं छोटंमोठं काम आपल्या लक्षात येतं. यही दुनिया है भाऊ... याला तुम्ही आम्ही काही नाही करु शकत..

सबस्क्राईब करा

* indicates required