computer

२०२१ मध्ये उत्तीर्ण विद्यार्थ्यांना नोकरी नाही? एचडीएफसी बँकेच्या जाहिरातीने विद्यार्थ्यांमध्ये खळबळ का माजली आहे?

कोरोना काळात परीक्षा होऊ शकल्या नाहीत. अशा परिस्थितीत पुढे ढकलले गेलेले विद्यार्थी किंवा ऑनलाइन परीक्षा देऊन पास झालेले विद्यार्थी यांचे भविष्य कसे असेल याबद्दल बऱ्याच चर्चा होत आहेत. अशावेळी एका जाहिरातीने मात्र या काळात पास झालेल्या विद्यार्थ्यांचे टेन्शन वाढवले आहे

एचडीएफसी ही देशातील आघाडीची बँक आहे. मदूराई येथील त्यांच्या शाखेत नविन पदभरती करायची होती. नेहमीप्रमाणे त्यांनी मुलाखतीसाठी उमेदवारांना बोलावणे धाडण्यासाठी वर्तमानपत्रात जाहिरात दिली. पण या जाहिरातीने देशभर खळबळ उडवली आहे.

एचडीएफसीच्या या जाहिरातीत स्पष्टपणे लिहिले आहे की, '२०२१ मध्ये पास झालेल्या विद्यार्थ्यांनी येऊ नये.' अशी जाहिरात वाचल्यावर या काळात पास झालेले विद्यार्थी तणावात येणे साहजिक आहे. एचडीएफसीच्या पाऊलावर पाऊल ठेवत इतरांनी पण तशी भूमिका घेतली तर या विद्यार्थ्यांनी नोकरी कुठे करायची?

सोशल मीडियावर लोकांनी एकजुटीने जेव्हा एचडीएफसीला धारेवर धरले, तेव्हा कुठे यावर एचडीएफसीने स्पष्टीकरण देऊन पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. एचडीएफसी केयरच्या ट्विटर हँडलवरून एका वापरकर्त्याला उत्तर देताना हे टायपिंग एरर असल्याचे म्हटले आणि कोणीही मुलाखतीस येऊ शकतो अशी पुष्टी जोडली.

यावेळी उठलेले वादळ बघून असे उघडपणे कोणी यापुढे २०२१ च्या पास विद्यार्थ्यांना डावलू शकत नसले तरी पडद्यामागे पण हे विद्यार्थी डावलले न जाता, गुणवत्तेवर त्यांची निवड व्हावी हे बघणे पण गरजेचे राहणार आहे.

सबस्क्राईब करा

* indicates required