computer

मैदानावर विणकाम करणारा खेळाडू आपल्याला काय शिकवून जातो? ह्या व्हायरल फोटो मागची गोष्ट वाचा!!

ऑलिम्पिकमध्ये देशविदेशातील विविध खेळात पदके मिळवणारे खेळाडू माहीत होतात असे नाही, तर या खेळाडूंची विविध रूपे पण समोर येत असतात. १ ऑगस्ट रोजी एका सामन्यादरम्यान असेच वेगळे काही लोकांना पाहायला मिळाले.

महिलांच्या स्प्रिंगबोर्ड डायव्हिंगचा फायनल सामना सुरू होता. प्रेक्षकांमध्ये बसलेल्या टॉम डेले याने मात्र सर्वांचे लक्ष खेचून घेतले. त्याने नुकतेच सुवर्णपदक जिंकले असले तरी हे कारण मात्र त्यामागे नव्हते. भाऊ प्रेक्षकांमध्ये बसून सुई धागा घेत कापड शिवत होते.

सुवर्णपदक विजेता खेळाडू प्रेक्षकांमध्ये बसला आहे हे बघून लोकांचे कुतूहल जागृत झाले तर हा इंग्लंडचा खेळाडू मस्तपैकी सुई दोऱ्याने कापडी पिशवी शिवत होता. हा भन्नाट प्रसंग खुद्द ऑलिम्पिकच्या ऑफिशियल हँडलवरून शेयर करण्यात आला.

अर्थातच हा व्हिडीओ लगेच वायरल देखील झाला आणि त्याचे चहुबाजूंनी कौतुक सुरु झाले. तो स्वतः मात्र अशा पद्धतीने विणकाम करणे हा आपला छंद असून यातून आपल्या मनाला शांतता मिळते असे म्हणाला. खरोखर अशा पद्धतीने जमिनीवर पाय ठेऊन जगण्याची मजा पण वेगळी असते.

क्रूरकर्मा औरंगजेब फावल्या वेळात टोप्या शिवायचा म्हणे. कुणाला कोणता आणि कसा छंद असेल काही सांगता यायचं नाही.

सबस्क्राईब करा

* indicates required