computer

आता व्हाट्सऍपवर पण फोटो गायब करता येणार? कसं करायचं ते शिकून घ्या!!

सोशल मीडिया जितका फायद्याचा आहे तितकाच तोट्याचा पण ठरू शकणारा विषय आहे, हे तसे घासून गुळगुळीत झालेले वाक्य. त्यात मोठे तथ्य आहेच पण यावर उपाय काय. तुम्ही एखाद्यावर विश्वास ठेवून महत्वाची गोष्ट त्याला पाठवली आणि त्याने तीच गोष्ट इतरत्र फॉरवर्ड केली तर काय? यात तुमचे महत्वाचे फोटो असू शकतात.

मग काय विश्वास ठेऊच नये काय? आता याचे उत्तर तुमचे तुम्ही शोधा. मात्र यावर थोडीशी का होईना, पण उपाययोजना खुद्द व्हाट्सऍपकडून केली गेली आहे. व्हाट्सऍपने एक नविन फिचर आणले आहे. हे फिचर खरोखर फायद्याचे ठरू शकते.

तुम्हाला आठवत असेल तुमचे मॅसेज ७ दिवसांनी आपोआप गायब होऊ शकतील असे फिचर व्हाट्सऍपने आणले होते. पण ७ दिवसांत एखादा मॅसेज कितीही फॉरवर्ड होऊ शकतो. तर यावर नविन उतारा व्हाट्सऍप घेऊन आले आहे.

तुम्ही जेव्हा एखाद्याला फोटो पाठवणार तर सेंड करण्यापूर्वी एक ऑप्शन येईल तो असेल 'view once' आधी या ऑप्शनवर टिचकी मारली तर समोरच्याने एकदा ते उघडले की दुसऱ्यांदा तो परत हा फोटो उघडू शकत नाही. तो फोटो तिथून गायब झालेला असेल.

आता याला थोडीफार उपाययोजना असे आम्ही का म्हटले ते सांगतो, तुम्ही फोटो पाठवला आणि समोरच्याने पहिल्यांदाच उघडून त्याचा स्क्रीनशॉट मारला तर काय? स्क्रीनशॉट हे सध्याच्या युगातील सर्वात मोठे हत्यार आहे. याचा प्रत्यय प्रत्येकास एकदा तरी आलेला असतोच. आता कुणाला काही करायचेच असेल तर त्यासाठी अनेक मार्ग असतात.

काही असो, व्हाट्सऍपकडून आपल्या वापरकर्त्याची गोपनीयता सुरक्षित रहावी म्हणून करण्यात आलेली ही उपाययोजना तशी उपयुक्तच आहे. गेले काही दिवस व्हाट्सऍप गोपनीयतेची काळजी घेत आहे असेच यावरून दिसत आहे. हे नवे फीचर व्हाट्सऍप अपडेट करून तुम्हाला वापरता येणार आहे.

सबस्क्राईब करा

* indicates required