इस्राएली लोकांनी अशा दिल्या भारतीय स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा!! व्हिडीओ पाहाच राव !!

Subscribe to Bobhata

मंडळी, उद्या आपला ७२ वा स्वातंत्र्य दिन आहे. त्यानिमित्ताने आत्तापासूनच आपल्याला शुभेच्छा यायला सुरुवात झालेली आहे. इस्राईलच्या नागरिकांनी एका खास व्हिडीओद्वारे आपल्याला शुभेच्छा दिल्या आहेत. या व्हिडीओमध्ये फक्त शुभेच्छा नाहीत तर एक सरप्राईज सुद्धा आहे राव. इस्रायली नागरिकांनी चक्क आपलं राष्ट्रगीत ‘जणगणमन’ गाऊन शुभेच्छा दिल्या आहेत.

राव, आपल्यापासून हजारो किलोमीटर लांब असलेल्या लोकांच्या तोंडून आपलं राष्ट्रगीत ऐकताना भारी तर वाटतंच. चला आता तुम्हीसुद्धा हा व्हिडीओ बघून घ्या.

तसं आपलं इस्राएलशी जुनं नातं आहे. इस्राएलहून स्थलांतरित झालेले लोक कोकणात शनवार तेली म्हणून ओळखले जायचे. त्यांच्यातले काही लोक परत मायदेशी गेले असले तरी अजूनही काही मूळ इस्राएल वंशाचे लोक महाराष्ट्रात आणि भारतातही आहेतच. परत गेलेल्या जुन्या पिढीनं मराठी भाषा तिथंही जोपासली आहे..

काही म्हणा, एकमेकांच्या देशांचा, त्यांचा राष्ट्रगीताचा आदर करणं ही खूप उदात्त भावना आहे आणि आज त्या भावनेतून दूर देशीच्या लोकांनी दाखवलेलं हे  प्रेम नक्कीच कौतुकास्पद आहे..

सबस्क्राईब करा

* indicates required