हा चित्रपट संपवल्यावर प्रसादाचं भोजन घेऊनच प्रेक्षक बाहेर पडायचे !!
Subscribe to Bobhata
आज गुरुनानक जयंतीनिमित्त एका वेगळ्याच चित्रपटाचा परिचय करून घेऊ या.
१९६९ साली "नानक नाम जहाज है " नावाचा चित्रपट प्रदर्शित झाला होता. पृथ्वीराज कपूर , आय. एस. जोहर , सोम दत्त (सुनील दत्त यांचे बंधू) आणि वीणा, विमी , निशा (सर्व पंजाबी अभिनेत्री) असा त्याचा स्टारकास्ट होता. सर्वोत्कृष्ट चित्रपट आणि सर्वोत्कृष्ट संगीत दिग्दर्शनाचं राष्ट्रीय पारितोषिक या चित्रपटाला मिळालं होतं. १९६९ साली या चित्रपटाला अभूतपूर्व गर्दी झाली होती. या चित्रपटाची लोकप्रियता इतकी शिखरावर पोहोचली होती की शोच्या शेवटी लंगर (प्रसादाचे भोजन ) घेऊनच मंडळी थिएटरच्या बाहेर पडायची. इतकेच नव्हे तर शो दरम्यान शीख नसलेले प्रेक्षक सुद्धा पगडी बांधून हा चित्रपट बघायचे. गेल्या वर्षी या चित्रपटाचा डिजिटल रीमेक पुन्हा एकदा पडद्यावर झळकला. आपण बघू या डिजिटल रीमेक केलेला ट्रेलर ..