भारत लवकरच होतोय मधुमेहाची राजधानी..

Subscribe to Bobhata

आज १४ नोव्हेंबर. जागतिक मधुमेह दिन.

उपलब्ध असलेल्या आकड्यांवरून आपला देश लवकरच मधुमेहाची राजधानी होणार आहे. याची कारणं अनेक आहेत पण त्यापूर्वी खाली दिलेल्या यादीतून आपल्याला काही होते आहे का ते तपासून बघा.


दिवसभरात आणि रात्रीसुद्धा वारंवार लघवी लागते का ?
घशाला सारखी कोरड पडते का ?
अशक्तपण आणि अचानक अशक्तपणा जाणवतो का ?
भूकेचे प्रमाण अचानक वाढते आहे का ?
दिवसेंदिवस काही कारण दिसत नसताना वजन कमी होते आहे का ?
स्नायूंमध्ये थकवा जाणवतो आहे का ?
दृष्टी क्षीण होते आहे का ? अंधुक दिसायला लागले आहे का ?
हातापायाला अचानक मुंग्या येणे किंवा बधीरता जाणवणे असे काही होते आहे का ?
जखम भरून येण्यास वेळ लागतो आहे का ?

आणि यापैकी बर्‍याच प्रश्नांचे उत्तर होकारार्थी असेल तर ताबडतो डॉक्टरांचा सल्ला घ्या. लक्षात घ्या, मधुमेह ही शारिरीक अवस्था आहे. जंतुसंसर्गाने होणार्‍या इतर रोगांसारखा  रोग नाही. त्यामुळे काही काळ औषधे घेतल्यावर औषधे सोडून चालणार नाही.
मधुमेहाचे व्यवस्थापन करणे हा एकच मधुमेहावर उपाय आहे. पण आम्ही हे सांगण्यापेक्षा सोबत दिलेली व्हिडीओ क्लिप बघा. 
 

सबस्क्राईब करा

* indicates required