हा 'सिम्बा' आहे की 'सिंघम' ?? ट्रेलर पाहून घ्या भाऊ !!

Subscribe to Bobhata

संजय लीला भन्सालीच्या गेल्या २ सिनेमांमध्ये ऐतिहासिक रोल करून थकलेल्या रणवीर सिंगला आता आजच्या काळातला सिनेमा हवा होता. तो त्याला रोहित शेट्टीने दिलाय राव. नाव आहे – सिम्बा.

आज ‘सिम्बा’चा ट्रेलर रिलीज झाला. हा सिनेमा म्हणजे ३०% सिंघम आणि ७०% साऊथच्या ‘टेम्पर’ सिनेमाचा रिमेक असा अजब जांगडगुत्ता आहे. आता हेच बघा ना ट्रेलरची सुरुवातच सिंघमच्या आवाजाने होते आणि शेवटही प्रत्यक्ष सिंघमच्या एन्ट्रीने. म्हणजे रोहित शेट्टीला 'सिंघम ३' ची घोषणा करायची असावी.

ट्रेलर मधून कथा काय समजते ते आता पाहूया. सिंघम कसा इमानदार पोलीस होता, तर त्याच्या अगदी उलट हा सिम्बा म्हणजे संग्राम भालेराव आहे. तो भरगच्च लाच घेतो. गुंडांना त्यांचं सत्कर्म करण्यास मदत करतो. पण हा तरी व्हिलन ठरत नाही कारण तो पिच्चरचा हिरो आहे ना राव. मग ह्या हिरोतील सच्चा पोलीसवाला जागा करायला काहीतरी घटना घडवली जाते. मग अचानक हा बॅड पोलीसवालाचा गुड पोलीसवाला होतो. याचं महत्व अधोरेखित करण्यासाठी इतर आजूबाजूची भडक पात्रं असतातच. सिंघम मध्ये अशोक सराफ यांचं पात्र होतं आणि सिम्बा मध्ये कदाचित सिद्धार्थ जाधव ते काम करेल.

एका गोष्टीची मात्र दखल घेतलीच पाहिजे. सिम्बा मध्ये यापूर्वी हिंदीत फारसे न झळकलेले भरपूर मराठी कलाकार आहेत. सिनेमा पाहण्याचं हे एक निमित्त असू शकतं.

राव, एकंदरीत ‘सिम्बा’ सिनेमा अफलातून अॅक्शन व डायलॉगच्या बाबतीत तुम्हाला निराश करणार नाही, पण कथेच्या बाबतीत फारशी आशा ठेवू नका.

चला तर आता तुम्ही ट्रेलर पाहून घ्या आणि तुमच्या प्रतिक्रिया द्या.

सबस्क्राईब करा

* indicates required