'दादा, मी प्रेग्नंट आहे' चे पोस्टर्स दिसत आहेत?? आम्ही सांगतो ही काय भानगड आहे..

शिवडेचं प्रकरण आठवतंय का राव. कसलं गाजलं होतं ते. सोशल मिडीयावर नुसतं ‘shivade i am sorry’ चालू होतं. शिवडेनं माफ केलं का नाय माहित नाय, पण पोलिसांनी धरला ना राव त्याला. हे झालं जुनं प्रकरण. आता एक नवीन प्रकरण आलंय राव. कोण्या मुलीनं पुण्यामुंबईत बॅनर छापलेत, म्हणे – ‘दादा, मी प्रेग्नंट आहे’. घ्या आता, हे काय पोस्टरवर सांगायचं असतंय का ??

आता ही ताई कोण अन तिचा हा दादा कोण ज्याला ती एवढी घाबरती की बॅनर छापून गुड न्यूज द्यावी लागली ? त्याचं काय आहे ना हे प्रकरण शिवडे सारखं किचकट नाहीय. आता सरळ सिक्रेटलाच हात घालतो राव. त्याचं काय आहे, ही एका नाटकाची जाहिरातबाजी आहे. या नाटकाचं नाव आहे ‘दादा, एक गुड न्युज आहे’.

स्रोत

प्रिया बापटच्या निर्मितीखाली तयार होणाऱ्या ‘दादा, एक गुड न्युज आहे’ या नाटकाचं हे अतरंगी प्रमोशन आहे राव. यातली बहिण म्हणजे ‘हृता दुर्गुळे. अहो ती फुलपाखरूवाली. आठवलं ना ? हो तीच ती.....तर, दादा आहे उमेश कामत. आज या नाटकाचं पोस्टर रिलीज झाल्यानंतर बॅनर मागचं सिक्रेट जगासमोर आलं. एक प्रकरण आठवडा, महिनाभर चघळणाऱ्या सोशल मिडीयाचा मात्र थोडा भ्रम निरास झाला.

तर मंडळी, यापुढे असले पोस्टर पाहिले की हरखून जाऊ नका. दरवेळी शिवडे सारखं प्रकरण असेलच असं नाही !!

सबस्क्राईब करा

* indicates required