computer

व्हिडीओ ऑफ दि डे : 'सेक्रेड गेम्सच्या २' मध्ये काय काय असेल ?? टीझर बघून काही अंदाज लागतोय का पाहा !!

“बस त्रिवेदी बचेगा !!” या वाक्याचा अर्थ आपल्याला लवकरच समजणार आहे. बातमी अशी आहे की जुलैच्या शेवटच्या आठवड्यात किंवा ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सेक्रेड गेम्स रिलीज होईल. हे ऐकून सेक्रेड गेम्सचे चाहते नक्कीच निराश होतील, पण थांबा !! तोवर सेक्रेड गेम्सचा टीझर बघून घ्या.

मंडळी, टीझर आहे केवळ २६ सेकंदाचा. आता तुम्ही म्हणाल की जेवणातलं लोणचंच तेवढं वाढलंय, पूर्ण थाळी कुठे आहे? त्यासाठी वाट पहावी लागेल भाऊ, पण तोवर आपण या २६ सेकंदामध्ये काय काय आहे ते पाहूया.

पहिली गोष्ट लक्षात येते ती म्हणजे २ नवीन अभिनेते दुसऱ्या भागात असणार आहेत. कल्की कोचलीन, सॉरी सॉरी.. कल्की केकलां आणि रणवीर शौरी. आता ही दोघं कोणतं पात्र साकारात आहेत याबद्दल माहिती मिळालेली नाही. दुसरी लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे गायतोंडे वेगळ्या लुकमध्ये आहे. पहिल्या भागात जसा तो बनियन आणि लुंगीत दिसतो तसा इथे नाहीय. म्हणजे पहिल्या भागाच्या शेवटी त्याला देशाबाहेर पाठवणार होते ते खरं होतं तर.

तिसरी महत्वाची बाब अशी की सगळ्यांचं लक्ष पंकज त्रिपाठी म्हणजे गुरुजी उर्फ गायतोंडेच्या तिसऱ्या बापाकडे आहे. म्हणजे मुख्य सूत्रधार तोच आहे का? हे ठामपणे नाही सांगू शकत कारण गोष्ट एवढी सोप्पीसरळ तर नक्कीच नसेल.

मंडळी, तुम्हाला काय वाटतं सेक्रेड गेम्सच्या दुसऱ्या सिझनमध्ये काय असेल ?? कमेंट बॉक्समध्ये होऊ दे चर्चा !!