computer

'कितने आदमी थे ?' गुगलला हा प्रश्न विचारल्यावर काय उत्तर येतं पाहा !!

गुगल दिवसेंदिवस “Cool” होत चाललं आहे राव. अॅव्हेंजर्स एंडगेम रिलीज झाला त्यावेळी गुगलने थानोसचा हात आणला होतों. या हातावर क्लिक केलं की सगळं एका चुटकीत अदृश्य व्हायचं. आज आम्हाला अशाच एका भन्नाट ट्रिकचा पत्ता लागलाय. यावेळी गुगलने भारतीय प्रेक्षकांना सरप्राईज दिलाय.
 

 

भारतातला एक आयकॉनिक सिनेमा सांगा म्हटल्यावर तुम्हाला अनेक नावं सुचतील, पण एक सिनेमा कॉमन असेल. तो म्हणजे – शोले. शोले हिट झाला तो त्यातल्या डायलॉगमुळे आणि गब्बर सिंगमुळे.

गुगलला हे माहित आहे की भारतीयांना गब्बर सिंग किती आवडतो. हे ओळखून त्यांनी एक भन्नाट ट्रिक आणली आहे. गुगल वर "कितने आदमी थे” असं सर्च केलं की गुगल कॅल्क्युलेटर ओपन होतो आणि तिथे तुमचं उत्तर तयार असतं. हे पाहा ते उत्तर.

 

राव, ही ट्रिक एका रेडीट युझरने शोधून काढली आहे. रेडीटवर त्याने शेअर केल्यानंतर बघता बघता ही ट्रिक व्हायरल झाली आहे. चला तर आता तुम्ही पण करून बघा. गुगलला विचार "कितने आदमी थे ?”