computer

गुगल वर 'Thanos' सर्च करा आणि पाहा काय जादू होते !!

राव, काही वर्षांपूर्वी बाहुबलीची प्रचंड क्रेझ आली होती. आजच रिलीज झालेल्या ‘अॅव्हेंजर्स-एंड गेम’ने बाहुबलीला चिक्कार मागे सोडून नवीन विक्रम केलाय. पहिल्यांदाच २४ तास थियेटर सुरु राहणार आहेत. रात्री ३ वाजेच्या शोची तिकिटं पण हातोहात विकली गेली आहेत. असा चमत्कार पहिल्यांदाच झालाय राव.

अॅव्हेंजर्सची क्रेझ एवढी वाढली आहे की गुगलने यानिमित्ताने एक खास ट्रिक लाँच केली आहे. तुम्हाला फक्त गुगलवर “Thanos” असा सर्च करायचा आहे. सर्च केला की उजवीकडच्या कोपऱ्यात थानोसचा हात दिसतो. या हातावर क्लिक करा आणि काय होतं ते पाहा.

थानोसची सगळी कमाल त्याच्या हातात आहे. गुगलने दिलेल्या ट्रिक मध्ये या हातावर क्लिक केल्यास सर्च केलेल्या गोष्टी अदृश्य होतात. तुम्हाला जर अदृश्य झालेल्या गोष्टी परत आणायच्या असतील तर शेवटी पुन्हा एकदा या थानोसच्या हातावर क्लिक करा.

मंडळी, तुम्ही अॅव्हेंजर्स-एंड गेम बघितला ? बघितला असेल तर तुम्हाला कसा वाटला ते सांगायला विसरू नका !!

सबस्क्राईब करा

* indicates required