computer

या १५ कलाकारांनी सिनेमात येण्यापूर्वी पडद्यामागे केलीयेत ही कामं !!

राव, सलमान, शाहरुख, आमीर पेक्षा बॉलीवूड मध्ये आलेली नवीन कलाकारांची फळी बॉलीवूड गाजवताना दिसत आहे. पण आजचे पडदा गाजवणारे कलाकार कधीकाळी पडद्यामागे होते हे तुम्हाला माहित आहे का ? आता उदाहरणच द्यायचं झालं तर, हृतिक रोशनने वडिलांच्याच ४ फिल्म्ससाठी सह दिग्दर्शक म्हणून काम केलं होतं तर सध्या चर्चेत असलेला विकी कौशल सुद्धा ‘गँग्स ऑफ वासेपूर’ सिनेमासाठी अनुराग कश्यपला सह दिग्दर्शक म्हणून मदत करत होता. सोनाक्षी सिन्हा तर ‘मेरा दिल लेके देखो’ सिनेमासाठी वेशभूषाकार म्हणून काम करत होती.

राव, या कलाकारांनी पडद्यामागून पडद्यासमोर एन्ट्री घेतली आणि सगळ्यांचच मन जिंकलंय. अशाच काही कलाकारांना घेऊन आज आम्ही शनिवार स्पेशल मध्ये.

चला तर ते कोणते कलाकार आहेत ते बघूया...

१. वरुण धवन

सह दिग्दर्शक - 'माय नेम इज खान'

२. सोनम कपूर

सह दिग्दर्शिका - 'ब्लॅॅक'

३. विक्रांत मास्सी

सह दिग्दर्शक - 'धूम मचाओ धूम'

४. रणबीर कपूर

सह दिग्दर्शक - 'ब्लॅॅक' आणि 'आ अब लौट चलें'

५. सिद्धार्थ मल्होत्रा

सह दिग्दर्शक - 'माय नेम इज खान'

६. कुणाल कपूर

सह दिग्दर्शक - 'अक्स'

७. सोनाक्षी सिन्हा

वेशभूषाकार - ‘मेरा दिल लेके देखो’

८. अर्जुन कपूर

सह दिग्दर्शक - 'कल हो ना हो' आणि 'सलामे इश्क'

९. इम्रान हाशमी

सह दिग्दर्शक - 'राझ'

१०. हर्षवर्धन कपूर

सह दिग्दर्शक - 'बॉम्बे वेलवेट'

११. अर्षद वारसी

सह दिग्दर्शक - 'ठिकाना' आणि 'काश'

१२. हृतिक रोशन

सह दिग्दर्शक - 'खुदगर्ज', 'करन अर्जुन', 'किंग अंकल' आणि 'कोयला'.

१३. परिणीती चोप्रा

पी.आर. कन्सल्टन्ट - यशराज फिल्म कंपनीसाठी

१४. विकी कौशल

सह दिग्दर्शक - 'गँग्स ऑफ वासेपूर’

१५. भूमी पेडणेकर

असिस्टंट कास्टिंग डिरेक्टर - यशराज फिल्म्स

 

 

तर मंडळी, यातला तुमचा आवडता कलाकार कोण ? आम्हाला नक्की सांगा !!

सबस्क्राईब करा

* indicates required