हॅकरचा हल्ला : भाग ३ - तुमच्या खात्यावर हॅकरने डल्ला मारलाच तर काय कराल !!

हॅकरने तुमच्या खात्यावर डल्ला मारू नये म्हणून काय उपाय केले पाहिजेत हे आपण कालच्या लेखात बघितलं. आज बघुयात इतकी काळजी घेतल्यावरही खात्यात घोटाळा झालाच तर काय करायचं आणि कायद्याचे कोणते कलम वापरायचे.

१. बँकेत प्रत्यक्ष जाऊन आपली तक्रार लेखी नोंदवून त्याची पोचपावती घेणे. हे करायला सोपे वाटते पण बहुतेक राष्ट्रीयकृत बँकेत " बघू , करू" अशी थातूरमातूर उत्तरे दिली जातात. अशा प्रसंगी त्या शाखेचा "कंप्लेंट रीड्रेसल ऑफीसर " कोण आहे याची चौकशी करावी. कंप्लेंट रीड्रेसल ऑफीसरला तुमची दखल घेणे अनिवार्य असते.  इतकेच नव्हे तर तुमच्या समस्येचे निराकरण ९० दिवसात करणे ही जबाबदारी पण बँकेची असते. 

स्रोत

२. "पोलीस कंप्लेंट करा आणि मग इकडे या " हे उत्तरही बर्‍याच वेळा ऐकायला मिळते . यावर "ते करणार आहेच, पण तुम्ही आधी तक्रार नोंदवून घ्या " असा आग्रह करण्याचा अधिकार बँकेच्या ग्राहकाकडे असतो. 

३. Section 46 आणि  43A  Information Technology Act, 2000  या कायद्याचा बडगा दाखवा. या कायद्याचे कलम माहिती असण्याची गरज नाही. कारण बँकेच्या अधिकार्‍याला पण ते माहिती नसतात. 

४. तुमच्या खात्यावर बँकेचा इन्शुरन्स क्लेम आहे का ते पाहा. तुमचे बँकेत सॅलरी खाते असेल, तर शक्यतो हा इन्शुरन्स क्लेम करता येतो. त्याचा फॉर्मही लगेच बँकेतून मागून घ्या.

५.  जर आपल्या तक्रारीची दखल वेळेत घेतली जात  नसेल (असे होत नाही ) किंवा बँकेनी दिलेला निर्णय तुमच्या विरुध्द जात असेल,  तर "बँक ओंब्डसमन" कडे जाण्याचा रस्ता शिलकीत असतो. पण तुमची तक्रार जर आधी बँकेकडे केलेली नसेल तर तुमचा या ठिकाणी दावा स्वीकारण्यात येत नाही. 

स्रोत

६.  समजा, बँक  ओंब्डसमनचा निकाल तुमच्या  विरोधात गेलाच तर , "अ‍ॅपेलेट ऑथॅरीटी " कडे अपील करण्याचा अधिकार ग्राहकाकडे असतो. अशा दाव्यासाठी  "अ‍ॅपेलेट ऑथॅरीटी " डेप्युटी गव्हर्नर रीझर्व्ह बँक ऑफ इंडिया असते.

७. कंझ्युमर कोर्टात देखील दाद मागता येते. 

शेवटी रिझर्व्ह  बँक ऑफ इडियाचे नोटीफीकेशन आम्ही सोबत देत आहोत.  त्याची प्रत तुमच्याकडे ठेवा.  ही कधी उपयोगात येईल ते काही सांगता  येत नाही.

 

आणखी वाचा :

हॅकरचा हल्ला - बँकेवर डल्ला : भाग १- आरबीआयची ग्राहक संरक्षण नियमावली

हॅकरचा हल्ला : भाग २ - तुमच्या खात्यावर हॅकरने डल्ला मारू नये म्हणून काय कराल ??

सबस्क्राईब करा

* indicates required