कट्टपाने बाहुबलीला का मारले ? उत्तर 28 एप्रिला मिळणार, बघा ट्रेलर !!!

Subscribe to Bobhata

पावणे दोन वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर ‘बाहुबली २’ म्हणजेच ‘बाहुबली : द कन्क्ल्युजन’ चा ट्रेलर आलेलाय ना भाऊ. शेवटी कटप्पाने बाहुबलीला का मारले ते समजणार आणि आपली या प्रश्नातून एकदाची सुटका होणार आहे. चित्रपट येत्या २८ एप्रिल २०१७ ला रिलीज होतोय.

चित्रपटाचे दिग्दर्शन अर्थातच एस एस राजमौलीने केले आहे तर प्रभास पासून राणा डुग्गुबती,  अनुष्का शेट्टी पर्यंत पहिल्या भागातील सर्वच कलाकार या नवीन भागातही दिसणार आहेत.

गम्मत म्हणजे या चित्रपटाचे एकूण चार क्लायमॅक्स सीन शूट झाले असून कोणता क्लायमॅक्स ठेवायचा हे अजून ठरलेले नाही. हा क्लायमॅक्स लिक होऊ नये म्हणून चांगलीच खबरदारी घेण्यात आली आहे.

पहिल्या भागाशी या भागाची तुलना होणे स्वाभाविक आहे. त्यामुळेच ट्रेलर बद्दल वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत. आता तुम्हीच हा ट्रेलर बघा आणि सांगा कसा वाटला हा ट्रेलर.

 

'बाहुबली २' चं नवं मोशन पोस्टर पाहिलंत का ?

'बाहुबली २' नंतर राजमौली या तिघांना घेऊन काय बनवतोय ते बघा !

सबस्क्राईब करा

* indicates required