हे किकी चालेंज काय आहे भाऊ ? किकी बद्दल सगळी माहिती फक्त एका क्लिकवर !!

मंडळी, तुम्ही ते व्हिडीओ पाह्यलेत का. कार मधून उतरायचं अन ‘किकी तू मायावर लव्ह करते का’ (kiki do you love me) गाण्यावर डँन्स करायचं ? अरं त्या गाण्यानं याड लावलंय पब्लिकला. सोशल मिडीयावर याच गाण्याची धूम. आधी सांगतो हा चालेंज हाय काय ?
काय असतं, चालत्या कार मधून उतरायचं आणि किकी गाण्यावर नाचायचं. नाचून झालं की परत कार मध्ये येऊन बसायचं. हे करत असताना कार चालवणाऱ्याने एक दार उघडं ठेवून व्हिडीओ सुदिक काढायचा अन कार पन चालवायची (हे पन एक चालेंजच हाय म्हणा).
एवढं सोप्पं वाटतं असलं तर तसं नाय मंडळी. आपल्याकडचे रोड म्हणजे काही कॅलिफोर्निया नाही ना राव. गाडीतून उतरलं, नाचायला लागलो अन मागनं गाडीनं ठोकलं तर ‘किकी’ किती महागात पडायची. अन त्यात व्हिडीओ काढतोय म्हटल्यावर धा लोक जमा होनार त्याचं काय. अन समजा गाडीतून उतरतानाच घसरलो तर ? ते जाऊद्या. हे गाणं कोनाचं हाय ते बघा.
किकी गाणं कोणाचं हाय ?
किकी गाणं कॅनेडियन हिपहॉप स्टार ‘ड्रेक’च्या ‘स्कॉर्पियन’ अल्बम मधलं हाय. या अल्बम मधी ‘इन माय फिलिंग’ गाणंय. त्याच गाण्यातले बोल हायत ‘किकी डू यु लव्ह मी’. बरं मज्जा म्हणजे या गाण्याचा अन या डँन्सचा झाड काय संबंध नाय !! या गाण्यात तर डँन्सच नाय ना राव. मग हे खूळ आलं कुठनं ?
शॉकर या कॉमेडीयनने किकी गाण्यावरचा त्याचा डँन्स व्हिडीओ व्हायरल केला होता. या व्हिडीओनंतर जगभरातली पब्लिक किकी डँन्स वर तुटून पडली. स्पेन, अमेरिका, मलेशिया, अरेबिया फिरत फिरत हे चालेंज भारतात येऊन पोचलं.
तर, विषय असा हाय की किकी चालेंजमुळं पोलिसांना आलंय टेन्शन. या याडचाप चालेंजमुळं लोक रस्त्यावर उतरून नाचतात त्याच्यामुळं इतर लोक पण धोक्यात येतात ना राव. उत्तर प्रदेश म्हणू नका, पंजाब म्हणू नका, जयपूर, मुंबई असं सगळीकडच्या पोलिसांनी (ट्विटर वरून) फर्मान काढून किकी सोडून कोणतंही चालेंज घ्यायला सांगितलंय. हे तर भारतातलंराव, अबुधाबी मध्ये तर किकी चालेंजवाल्यांची धरपकड चालू हाय.
Not just a risk for you but your act can put life of others at risk too. Desist from public nuisance or face the music ! #DanceYourWayToSafety #InMySafetyFeelingsChallenge pic.twitter.com/gY2txdcxWZ
— Mumbai Police (@MumbaiPolice) July 26, 2018
किकीचे ताबलातोड व्हिडीओ बरोबरच किकी करताना तोंडावर पडलेल्यांचेपन व्हिडीओ व्हायरल होतायत. चालेंज घेत असाल तर हे व्हिडीओ आधी बघून घ्या !!
सगळं ठीक हाय पण चालेंज पूर्ण केल्यावर काय बक्षीस मिळल ते कोनी सांगत नाहीये !!