computer

मल्टीप्लेक्स नेहमी मॉलच्या सर्वात वरच्या मजल्यावर का असतात ??

मोठ्या शहरांमध्ये सिनेमा थिएटर्स मॉल्समध्ये असतात. त्यालाच मल्टिप्लेक्स म्हणतात. तुम्ही अनेकदा मल्टिप्लेक्समध्ये सिनेमा पाहिला असेल, पण कधी विचार केला आहे का की मॉलमध्ये मल्टिप्लेक्स सर्वात वरच्या मजल्यावर का बांधलेले असतात?

या प्रश्नाला एकंच एक उत्तर नाही. ३ प्रकारची उत्तरं देता येतील. चला तर जाणून घेऊया.

१.

सिनेमा हा असा व्यवसाय आहे जो कधीच ठप्प पडत नाही. त्यामुळे वर्षभर लोकांचा लोंढा मल्टिप्लेक्सकडे येत असतो. शॉपिंग मॉल्सच्या सर्वात वरच्या मजल्यावर मल्टिप्लेक्स बांधल्याने माणसं जेव्हा वरती यायला निघतात तेव्हा त्यांना मॉलचे इतर मजले फिरून यावे लागतात.

लोक फक्त सिनेमा बघायचं ठरवून आलेले असतात पण त्यांच्या नजरेस पडतं - मॉलचा झगमगाट, वेगवेगळी उत्पादनं, ऑफर्स, डिस्काऊंट, सेल, इत्यादी. सिनेमा बघायला आलेल्या व्यक्तीला मॉलची भुरळ नक्कीच पडते आणि तो काही ना काही खरेदी करूनच जातो. अगदी सगळेच खरेदी करत नसतील तरी पुन्हा पुन्हा मॉलमध्ये यावसं नक्कीच वाटतं. याच कारणासाठी फूड-कोर्ट सुद्धा सर्वात वरच्या मजल्यावर असतो.

२.

दुसरं कारण असं देता येईल, की सिनेमा हॉलला मोठी जागा लागते. काही मॉलमध्ये एक संपूर्ण फ्लोर सिनेमा हॉलसाठी असतो. जर सिनेमा हॉल पहिल्या किंवा दुसऱ्या मजल्यावर असेल तर इतर दुकानांसाठी अडचण होऊ शकते.

३.

तिसरं कारण आहे सुरक्षितता. मल्टीप्लेक्समध्ये अन्न-पदार्थ सुद्धा विकले जातात. ते तिथेच शिजवले जातात. याचा अर्थ तिथे आग लागण्याची शक्यता असते. मल्टीप्लेक्स सर्वात वरच्या मजल्यावर असल्याने आग लागलीच तर लोकांना इमर्जन्सी गेटने बाहेर काढणे सोप्पे पडते. वरच्या माज्ल्यापेक्षा खालचे माजले आगीपासून जास्त सुरक्षित असतात.

 

तर मंडळी, अशारितीने खूपच डोकेबाज पद्धतीने तयार केलेलं हे एक व्यावसायिक धोरण आहे.

सबस्क्राईब करा

* indicates required