computer

सिगारेट सोडण्याचे १० साधेसोपे उपाय!!

सिगरेट पिणारे लोक सिगरेट सोडण्यासाठी फार प्रयत्न करतात.  पण दरवेळी फक्त एवढा एक कश म्हणत सिगरेट सुटता सुटत नाही. तशी सुरवात पण एक कशपासूनच होते. कुणीतरी सांगतो, "एवढा एक कश मार. काही नाही होणार". मग एक कश वरून गाडी कशी एका पाकिटावर येऊन पोचते कळत नाही. 

अनेकांची सिगरेट सोडण्याची इच्छा असते. पण बरेच प्रयत्न केलेतरी सिगरेट सुटत नाही. मंडळी, अशा लोकांसाठी आम्ही काही टिप्स घेऊन आलो आहोत. त्या सवयी अंगी बाणवल्या तर तुमच्या सिगरेटच्या व्यसनावर चांगला परिणाम होऊ शकतो.

1)

जेव्हा कधी सिगरेट प्यायची इच्छा होईल तेव्हा रनिंगला निघून जावे. फिटनेस वाढेल आणि धावताधावता सिगारेट प्यायची तलफही मागे पडेल. 

2)

सिगरेट प्यायची तलफ यायला लागल्यावर तुमच्या आवडत्या कल्पनेचा विचार करा.  याने काय होईल की, एकदा त्या कल्पनेचं गारुड मनावर स्वार झालं की दुसरे काही करायची ईच्छा तुम्हाला राहणार नाही. आपोआप सिगरेटची तलफ पण नाहीशी होईल. 

3)

आपण दिवसात बऱ्याचवेळा तहान लागली तरी पाणी प्यायचा कंटाळा करतो. जेव्हा शरीरात पाण्याची कमी असते तेव्हा तणावात वाढ होते, आणि मग सिगरेट प्यायची इच्छा होते. यापासून बचावासाठी पाणी जास्तीत जास्त पिणे कधीही चांगले. 

4)

एका वहीवर सिगरेट पिण्याचे तोटे आणि सिगरेट सोडण्याचे फायदे लिहून काढा आणि ती तुमच्या नेहमीच्या सिगरेट पिण्याच्या जागेवर चिकटवा. म्हणजे जेव्हा कधी तुम्ही सिगरेट पिणार तेव्हा त्याचे तोटे तुमच्या समोर येतील आणि कदाचित तुमची सिगरेट पिण्याची ईच्छा मरून जाईल.

5)

आवडते काम करत राहा. जेव्हा कधी तुम्हाला सिगरेट प्यायची इच्छा होईल तेव्हा तुमची आवडती गाणी ऐका किंवा आवडता चित्रपट बघा जेणेकरून तुमचे ध्यान इतर ठिकाणी केंद्रित होईल. 

6)

पोटात काही नसले की मग काय करावे सुचत नाही. बऱ्याचवेळा होते काय, भूक लागली आहे की सिगरेटची तलफ यात फरकच करता येत नाही. जर पोटात चांगले अन्न असले की अशी समस्या निर्माण होत नाही. पुढच्या वेळी जर स्मोक करण्याची इच्छा झाली तर काहीतरी छानसं खाऊन बघा.

7)

सिगारेटीची तलफ घालवण्यासाठी जेव्हा कधी स्मोक करण्याची इच्छा होईल तेव्हा एखाद्या जवळच्या मित्राला कॉल करा. गप्पांमध्ये केव्हा सिगरेटचा विसर पडेल कळणार पण नाही. 

8)

मंडळी, दारू सोडणे सिगरेट सोडण्यापेक्षा सोपे असते. सहसा दारू पिताना स्मोक करण्याची इच्छा निर्माण होते. जर दारू सोडली तर सिगरेट पिण्याच्या सवयीवर सुद्धा त्याचा परिणाम होईल. 

9)

सिगरेट सोडण्यासाठी स्पेशल सिगरेटीही मिळतात. निकोटिनचे च्युईंगम सिगरेट सोडण्यासाठी मोठया प्रमाणावर साहाय्य करु शकतात.

10)

मेडिटेशनचे अनेक फायदे आहेत. सिगरेटच्या व्यसनावर पण मेडिटेशन गुणकारी ठरू शकते.

 

पाह्यलंत, काही करायचे असेल तर एकापेक्षा एक बढकर हजारो मार्ग निघतात. तुम्ही सुरुवात तर करुन पाहा.

 

लेखक : वैभव पाटील

 

 

आणखी वाचा :

निकोटीन गमने खरोखर सिगरेटचं व्यसन सुटतं का ? वाचा विज्ञान काय म्हणतंय !!

प्लास्टिकमुळे नाही तर चक्क या गोष्टीमुळे होत आहे समुद्र सर्वाधिक दूषित!!

सबस्क्राईब करा

* indicates required