computer

बिसलेरीची बाटली पुन्हा पुन्हा वापरू नये? काय आहे कारण ?

मंडळी, लेखाचं नाव वाचून तुम्हाला नक्कीच वाटलं असणार की आता हे लोक प्लास्टिकमध्ये काही तरी केमिकल असतं असं सांगतील, किंवा प्लास्टिकमुळे कॅन्सर होतो असं सांगतील.  पण भाऊ कारण काहीतरी वेगळंच आहे. चला तर जाणून घेऊया.

मंडळी, आपल्याकडे प्रत्येक बाटलीबंद पाण्याला बिसलेरी म्हणण्याची सवय आहे, त्यामुळे आम्ही लेखाच्या नावातही बिसलेरी म्हटलंय. पण हा लेख एकूणच बाटलीबंद पाण्याबद्दल आहे.

प्लास्टिक बॉटलबद्दलची गैरसमजूत-

२०१४ साली इंटरनेटवर एक मेसेज फिरत होता. प्लास्टिक बॉटल्समध्ये “डायथिलहाइड्रोक्साइलामाइन” (DEHA) हे रसायन असतं. DEHA मुळे आपल्याला कॅन्सर होऊ शकतो. या कारणाने पाण्याच्या बॉटल्समुळे कॅन्सरचा धोका निर्माण होऊ शकतो असं म्हटलं जात होतं. पण ही बातमी खोटी होती हे लवकरच सिद्ध झालं. बाटलीबंद पाण्यासाठी जे प्लास्टिक वापरलं जातं त्याला ‘पॉलीथिलीन टीरेफेथालेट’ (PET) म्हणतात. या प्रकारच्या प्लास्टिकमध्ये DEHA नसतं. एकंदरीत बाटलीबंद पाण्यामुळे कोणालाही कॅन्सर होणार नाही.

मग धोका काय आहे?

आता आपल्या विषयाकडे वळूया. धोका प्लास्टिकच्या बॉटलमध्ये नाहीय राव, धोका निर्माण होतो बाटली आपल्याकडे आल्यानंतर. एक लक्षात घ्या, बिसलेरीसारख्या पाण्याच्या बाटल्या पुन्हा वापरण्यासाठी बनलेल्या नसतात. त्यामुळे पुन्हापुन्हा वापरून त्यांची झीज होते. गुळगुळीत झालेल्या आणि त्यांच्यावर पिवळसर डाग आलेल्या बाटल्या तुम्ही पाहिल्याही असतील. अशा बाटल्या मग बॅक्टेरियांच्या वाढीसाठी आणि राहण्यासाठी उत्तम घर बनतात.

मंडळी, बाटली वापरायचीच झाली तर टपरवेअरसारख्या, खास पाणी ठेवण्यासाठी असलेल्या बाटल्या वापरणं केव्हाही चांगलंच. किंवा मग तुम्ही स्टीलच्या बाटल्याही वापरू शकता. हे दोन पर्याय तुमच्यासाठी उपलब्ध आहेत.

तर मंडळी, पावसाळा आला आहे याचा अर्थ पाण्यातून होणारे रोगही येतील. त्यासाठी ही काळजी नक्की घ्या.

 

आणखी वाचा :

हे आहेत भरपूर पाणी पिण्याचे ५ महत्वाचे फायदे !!

फळांवर फवारणी केलेले किटकनाशक घालवायचा हा सर्वोत्तम उपाय आहे !!

पाण्याच्या बाटलीऐवजी चक्क पाण्याचे गोळे ? काय प्रकरण आहे हे ??

मीनरल वॉटर, प्युरीफाईड वॉटर, डीस्टील्ड वॉटर... या सगळ्यात काय फरक आहे राव?

सबस्क्राईब करा

* indicates required