computer

हे आहेत भरपूर पाणी पिण्याचे ५ महत्वाचे फायदे !!

मित्रांनो, पाणी पिण्याचे महत्व सगळ्यांना माहीत आहे.  उत्तम आरोग्यासाठी पाणी  पिणे गरजेचे आहे.  खासकरून उन्हाळ्याच्या दिवसात जास्तीत जास्त पाणी प्यायलाच हवे.  पाणी पिण्याने वजन आटोक्यात राहाते आणि  मेंदूला तजेलदार ठेवण्यासाठीसुद्धा पाणी प्यायल्याने मदतच होत असते. लग्नाआधी नवऱ्या मुलीनं भरपूर पाणी प्यायलं आणि पुरेशी झोप घेतली तर तिचं सौंदर्य दुपटीने खुलते असेही म्हटले जाते. आपल्यापैकी बऱ्याचजणांना पाणी पिण्याचं महत्त्व पटतं, पण कामाच्या रगाड्यात प्रत्यक्ष पाणी पिणं मात्र लक्षात राहात नाही. त्यासाठी प्लेस्टोअरवर दर तासाने किंवा तुम्हांला हव्या त्या वेळेस पाणी पिण्याची आठवण करुन देणारी ॲप्सपण आहेत. थोडक्यात, पाणी हे खरोखरी जीवन आहे!!

तर मंडळी,  आज आपण पाणी पिण्याचे काही शास्त्रीय फायदे जाणून घेणार आहोत. जास्तीत जास्त पाणी पिणे कसे शरीराला चांगले आहे आणि पाणी पिण्याने कुठले फायदे होतात याची माहिती बोभाटाच्या वाचकांसाठी खास आम्ही घेऊन आलो आहोत. 

१. आपले वजन

वजन कंट्रोलमध्ये  ठेवण्यासाठी पाण्याचा खूप उपयोग होतो. नियमित जास्तीत जास्त पाणी पिण्याने वजन कमी होते. अन्य द्रव्य पदार्थांशी तुलना करता पाणी प्यायल्याने जास्त कॅलरीज जळतात. 

२. अन्नपचन- मेटाबॉलीझम व्यवस्थित राहाते.

रोज जास्त प्रमाणात पाणी पिण्याने मेटाबॉलीझम- ज्याला आपण चयापचयही म्हणतो- व्यवस्थित राहते. याने शरीराला भरपुर एनर्जी मिळते. पाणी जास्त पिण्याने रोजची कामेही मोठ्या उत्साहाने होतात.  

३. मेंदू तजेलदार राहतो.

भरपूर पाणी पिण्याने मेंदू तजेलदार राहतो. पाणी पिण्याने लक्ष एके ठिकाणी केंद्रित करण्याची क्षमता वाढते. मनाची चंचलता जाऊन शांत होण्यास मदत होते. त्याचप्रमाणे रागावर नियंत्रण मिळवता येते.

४. विषारी पदार्थ दूर होतात

मंडळी, आपल्या शरीरात बऱ्याच गोष्टी असतात. त्यातलेच एक आहेत पचननलिका, लिव्हर म्हणजे यकृत आणि किडनीत असणारी विषारी द्रव्ये.  योग्य प्रमाणात पाणी पिण्याने हे विषारी पदार्थ शरीरात शोषले जातात. याने त्वचा चांगली राहते. आणि लवकर म्हातारे होण्याची समस्या पण येत नाही. रोज जास्त प्रमाणात पाणी पिण्याने चेहऱ्यावर टवटवी आणि तजेला येतो.

५. झोप चांगली येते

झोपण्यापूर्वी काही मिनिटांआधी पाणी पिण्याने मूड चांगला राहण्याला मदत होते आणि झोप पण चांगली येते. पाणी शरीराला डिटॉक्स करण्याचे सर्वात चांगले माध्यम आहे. झोपण्यापूर्वी थोडे गरम पाणी प्यायले  तर रात्रभर शरीरतले पाण्याचे प्रमाण व्यवस्थित राहाते.  

मंडळी पाणी पिण्याचे एवढे सगळे फायदे माहीत झाल्यावर दिवसाला 10-12 ग्लास पिणे गरजेचे आहे. पाणी पाण्यामुळे अनेक समस्या टळतातच आणि विशेषत: उन्हाळ्याच्या दिवसात पाणी माणसाला उत्साही ठेवायला मदत करते. 

म्हणून मित्रांनो, तुमच्या मित्रांना पण पाण्याचे महत्व सांगा आणि हा लेख जास्तीत जास्त शेअर करा...

 

आणखी वाचा :

पाण्याच्या बाटलीऐवजी चक्क पाण्याचे गोळे ? काय प्रकरण आहे हे ??

मीनरल वॉटर, प्युरीफाईड वॉटर, डीस्टील्ड वॉटर... या सगळ्यात काय फरक आहे राव?

फळांवर फवारणी केलेले किटकनाशक घालवायचा हा सर्वोत्तम उपाय आहे !!