कोरोनाशी लढताना कोणती सजगता बाळगावी? हे सांगतायत डॉ.तुषार जगताप !!

आपली इच्छा असो वा नसो, व्हॉट्सअ‍ॅपचे 'फास्ट फॉरवर्डस्' दिवसभर काहीतरी तुमच्या खात्यात ढकलतच असतात. गेल्या वर्षी ही मंडळी रात्री अमुकतमुक वाजता घातक किरणं पृथ्वीवर येणार आहेत, मोबाईल बंद ठेवा, सावध राहा असा मेसेज पाठवायची, तेच लोक आता कोवीड आणि करोनाबद्दल काही ना काहीतरी पोस्ट ढकलत असतात. 
आज आमच्याकडेही एक पोस्ट आली. घरी कोवीड किट तयार ठेवा, या किटमध्ये आवश्यक असलेल्या वस्तू तुमच्या घरात आहेत का? ते चेक करा वगैरे  वगैरे.  वरवर बघता ही पोस्ट उपयुक्त वाटत होती. पण मंडळी बोभाटाचा नियम तुम्हाला माहितीच आहे. फॅक्ट चेकिंग म्हणजे सत्यता पडताळणीनंतरच लेख लिहायचा हा बोभाटाचा कायदा आहे. म्हणून आम्ही ती पोस्ट बोभाटाचे मित्र डॉ. तुषार जगताप यांना पाठवली. 
डॉ तुषार जगताप गेली तीस वर्षे लोकांना वैद्यकीय सेवा देत आहेत. व्यवसायाने डर्मॅटॉलॉजीस्ट तर आहेतच, पण अत्यंत चांगले वक्ते आणि सल्लागार आहेत. त्यांनी ती पोस्ट वाचल्यावर बोभाटाच्या वाचकांसाठी एक खास व्हिडीओ पाठवला आहे. या व्हिडिओमध्ये अनेक शंकांचे निराकरण करण्यात आलेले आहे. तर बघा, कोरोनाशी लढताना कोणती सजगता बाळगावी? हे सांगतायत डॉ. तुषार जगताप!!

 

सबस्क्राईब करा

* indicates required