computer

पाहा शंभर वर्षांपूर्वीही कसं घडलं होतं मास्क, फेसशील्ड आणि क्वारनटाईन..

मानवी इतिहासात अनेकदा वेगवेगळ्या रोगांनी थैमान घातलेलं आहे. कधी प्लेग तर कधी देवी, आणि सध्या तर कोरोना सारख्या महामारीनं संपूर्ण जगालाच हादरा दिलाय. असाच एक रोग जवळजवळ शंभर वर्षापूर्वी येउन गेला. त्याचं नाव होतं ‘स्पॅनिश फ्ल्यू’.

१९१८ ते १९२० या काळात ‘स्पॅनिश फ्ल्यू’मुळे जगभरात तब्बल ५ ते १० कोटी लोकांचा जीव गेला होता. एकट्या भारतातच जवळजवळ २ कोटी माणसांचा बळी गेला. या रोगाने जगाची २ ते ५ टक्के लोकसंख्या साफ केली होती. त्यावेळी या रोगापासून लांब राहण्यासाठी जे नियम आखण्यात आले होते ते अगदी आजच्या सारखेच होते. लोकांनी सोशल डिस्टंसिंगचे नियम पाळले होते, मास्क लावला होता आणि स्वच्छता राखली होती. आम्ही काय सांगतोय, तुम्हीच पाहा ना. तुम्हालाही इतिहासाचं एक वर्तुळ पूर्ण झाल्याचा भास होईल.

आजच्या सारखे फेसशील्ड त्याकाळी नव्हते म्हणून काय जुगाड केला होता पाहा.

हे नियम आजही तितकेच लागू पडतात.

फेसशील्डला फॅशनची जोड

'स्पॅनिश फ्ल्यू'च्या काळातील बेसबॉल गेम.

टेलिफोन कंपन्यांनी महामारीचा असाही फायदा करून घेतला होता. ही जाहिरात पाहा.

त्याकाळातलं लॉकडाऊन

ही पाटी आजच्या काळातही लावण्यास हरकत नाही.

बाहेर जाताना घ्यायची काळजी.

घरी रहा, सुरक्षित राहा.

आता आम्ही तुम्हाला मास्कचे वेगवेगळे प्रकार दाखवणार आहोत. हा पहिला फोटो पाहा.

२. मास्कची जाहिरात पाहा.

३. मास्कही फॅशनप्रमाणे. आजच्या काळातही असे वेगवेगळे प्रकार पाहाय मिळण्याची शक्यता आहे.

सामान्य मास्कही होते त्या काळात.

‘स्पॅनिश फ्ल्यू’बद्दल आणखी जाणून घेण्यासाठी खालील लेख जरूर वाचा

१०० वर्षांपूर्वी या रोगाने घेतला होता तब्बल २ कोटी भारतीयांचा बळी!!

सबस्क्राईब करा

* indicates required