computer

मास्क कसा लावावा, कसा काढावा? मास्क बद्दल सर्व महत्त्वाच्या गोष्टी जाणून घ्या !!

सध्याच्या घडीला फेस मास्क वापरणे हा कोरोनापासून वाचण्याचा सर्वमान्य उपाय मानला जात आहे. मास्क असले की  लोकांना बाहेर फिरताना देखील आत्मविश्वास वाटतो. 

पण मास्क खरंच वाटतो तेवढा उपयोगी आहे का? तर हो. पण त्यासाठी मास्क योग्य पध्दतीने वापरायला हवा. मास्क कसा लावावा, कसा काढावा, त्याचप्रमाणे लावलेला असताना मास्क नक्की कसा असायला हवा हे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

सर्जिकल मास्क

आयताकृती आकाराचे हे मास्क युज अँड थ्रो अशा पद्धतीचे असतात. इलॅस्टिक बँड असेलेल्या या मास्कला एक धातूची पट्टी लावलेली असते. 

हे सर्जिकल मास्क व्यवस्थितरित्या लावले तर उडणारे शिंतोडे, थेंबापासून संक्रमित होणारे जीवाणू हे सारे सहज रोखले जातात. हाताचा चेहऱ्याशी होणाऱ्या संपर्कावरसुद्धा या मास्कमुळे बंधने येतात 

या माँस्कमधील तीन पदर असतात-

1) बाहेरील पदर- पाणी, रक्त यांच्यासारख्या ओलसर गोष्टींना रोखतो

2) मधला पदर- विषारी जीवाणूंना फिल्टर करतो

3) आतील पदर- घाम शोषून घेऊन त्याद्वारे होऊ शकणारे संक्रमण रोखतो.

पण हा मास्क चेहऱ्याभोवती टाईट गुंडाळला जात नाही आणि त्यामुळे शिंक आणि खोकल्यामार्फत संक्रमित होणारे छोटे कण रोखण्यात तो कमी पडतो.

सर्जिकल मास्क केव्हा लावायला हवा?

WHO ने हा मास्क केव्हा वापरायला हवा याच्या गाईडलाईन्स सांगितल्या आहेत.

1) खोकला, ताप किंवा श्वसनाशी संबंधित काही समस्या असतील तर.

2) वरील समस्या असलेला व्यक्ती तुमच्या 6 फुटांच्या अंतराच्या आत असेल तेव्हा.

वाचकहो, हा मास्क तुमचा मोठया थेंबापासून तर सहज बचाव करतो, पण हा मास्क छोटे कण फिल्टर करण्यास अक्षम आहे आणि चेहऱ्याभोवती घट्ट बांधलेला नसल्यामुळे आजूबाजूच्या फटीतून छोटे कण सहज आत जाऊ शकतात.

सर्जिकल मास्क कसा लावायचा?

1) मास्क लावण्याआधी साबणाने किंवा सॅनिटायझरने हात स्वच्छ धुवून घ्यावे.

2) मास्क कुठे फाटला आहे का एकदा चेक करून घ्यावा.

3) मास्कचा रंगीत भाग बाहेरील बाजूस असू द्यावा.

4) धातूची पट्टी बरोबर नाकाच्या शेंड्यावर येईल असा मास्क लावावा.

5) इयर लूप कानाजवळ धरून प्रत्येक इअर लूप कानावर लावावा.

6) आपल्या बोटांनी धातूची पट्टी नाकाच्या आजूबाजूला वाकवावी. 

7) मास्कची खालची बाजू आपल्या दाढीजवळून किंवा हनुवटीजवळून वर ओढावी.

8) मास्क व्यवस्थित बसला आहे का याची खात्री करून घ्यावी.

9) एकदा मास्क लावला गेल्यावर पुन्हा पुन्हा त्याला हात लावू नये

10) कुठल्याही पद्धतीने मास्क डॅमेज झाल्यास त्याचा परत वापर करू नये 

मास्क घातल्यावर काय करू नये?

1) एकदा मास्क व्यवस्थित लावला गेल्यावर त्याला हात लावू नये.

2) एकाच कानावर टांगून दुसऱ्या कानाची अडकवणी सोडून ठेवली असे करू नये.

3) मास्क गळ्याभोवती टांगावा.

4) सिंगल युज मास्क परत वापरू नये.

मास्क घातल्यावर जर चुकून तुमचा हात मास्कला लागला तर आधी हात स्वच्छ धुवून घ्या.

मास्क कसा काढायचा?

1) आधी स्वच्छ हात धुवून घ्या.

2) थेट मास्कला हात लावू नका. बँड, टाय किंवा कानाच्या अडकवण्या सोडवून मास्क काढा.

एकदा मास्क काढून झाल्यावर तो कचरा पेटीत टाकून हात स्वच्छ धुवून घ्या.

मंडळी, असे असले तरी या वायरसपासून वाचण्यासाठी लोकांचा शक्यतो संपर्क होणार नाही याची काळजी घेणे हे सर्वात महत्वाचे आहे.

 

लेखक : वैभव पाटील

सबस्क्राईब करा

* indicates required